अभिनेत्री तब्बू आज बॉलिवूडमध्ये स्वतंत्र आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखली जाते. ‘दृश्यम 3’ सिनेमामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. परंतु, तिच्या करियरच्या सुरुवातीच्या काळातील काही खासगी घटना अजूनही लोकांच्या स्मरणात आहेत.
फार कमी लोकांना माहित आहे की, तब्बूने अभिनय करिअरची सुरुवात अभिनेता संजय कपूरसोबत केली होती. ‘प्रेम’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान तब्बू आणि संजय यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले, पण हे नातं फार काळ टिकले नाही. संजय कपूरच्या मते, “सिनेमापूर्वीच आमचं नातं संपलं आणि आम्ही एकमेकांशी बोलणंही थांबवलं.”
तब्बूने देखील त्यांच्या रिलेशनशिपबद्दल खुलेपणाने बोललं. त्यांनी म्हटलं, “संजय रिलेशनशिपमध्ये असताना, माहीप कपूरला डेट करत होता.” नंतर माहीप आणि संजय यांचं लग्न झालं, तर तब्बू आजही स्वतंत्र आयुष्य जगत आहे.
माहिप कपूरच्या आठवणीनुसार, तिचा संजयसोबतचा पहिला संवाद एका पार्टीदरम्यान झाला, ती नशेत होती आणि अनोळखी व्यक्तीसोबत वन नाईट स्टँड अनुभवला. त्या अनुभवानंतर संजयने तिचा स्वीकार केला आणि त्यांचं प्रेम नंतर लग्नात परिवर्तित झालं. आज संजय आणि माहिप यांचा विवाहाला ३० वर्ष पूर्ण झाली आहेत.




