Sanjay Dutt : संजूबाबाचा ‘रुद्रावतार’! ‘धुरंधर २’च्या यशानंतर पापाराझींवर भडकला अभिनेता

spot_img

पत्नी आणि मुलांसोबत असताना कॅमेरे पाहून संजय दत्तचा पारा चढला; ‘बंद कर ना बे’ म्हणत फोटोग्राफर्सना फटकारले

बॉक्स ऑफिसवर सध्या आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर २’ या चित्रपटाने धुमाकूळ घातला असून, यामध्ये ‘अस्लम चौधरी’ ही तगडी भूमिका साकारणाऱ्या संजय दत्तच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, या यशाच्या जल्लोषातच संजय दत्तचा एक संतापलेला व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. आपल्या कुटुंबासह पत्नी मान्यता आणि मुले शहरान व इकरा यांच्यासोबत बाहेर पडलेल्या संजयला पापाराझींनी गराडा घातला. सततचे फ्लॅश आणि व्हिडिओ शूटिंग पाहून संजूबाबाचा संयम सुटला आणि त्याने थेट ‘बंद कर ना बे’ अशा कडक शब्दांत फोटोग्राफर्सना झापले. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या असून, अनेकांनी त्याला “खऱ्या आयुष्यातील अस्लम चौधरी” म्हटले आहे.

चित्रपटात ‘बलुच’ द्वेषी पोलीस अधीक्षकाची भूमिका गाजल्यानंतर आता संजय दत्तने आपल्या आगामी ‘आखिरी सवाल’ या चित्रपटाची घोषणा करून चाहत्यांना आणखी एक सरप्राईज दिले आहे. या चित्रपटाचा ‘फर्स्ट लूक’ नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून, हा चित्रपट १५ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिजीत मोहन वरांग यांच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या या चित्रपटात संजय दत्तसोबत अमित साध आणि समीरा रेड्डी यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. एकीकडे ‘धुरंधर २’ मुळे मिळालेले यश आणि दुसरीकडे पापाराझींवरील संताप, अशा दोन्ही कारणांमुळे सध्या बॉलिवूडचा हा ‘मुन्नाभाई’ चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ