spot_img

Sanjay Dutt : फोटोग्राफरने सांगितला संजय दत्त यांचा अनोखा किस्सा

spot_img

शूटिंगदरम्यान दारूचा आग्रह आणि अपघातानंतरची माणुसकी; वरिंदर चावलांचा खुलासा

हिंदी चित्रपटसृष्टीत ‘संजू बाबा’ म्हणून ओळख निर्माण केलेले संजय दत्त हे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. दमदार भूमिका, सुपरहिट चित्रपट, वादग्रस्त आयुष्य आणि प्रचंड चाहतावर्ग यामुळे ते कायम चर्चेचा विषय ठरले. मात्र अलीकडेच प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर वरिंदर चावला यांनी संजय दत्त यांच्याशी संबंधित काही जुन्या आठवणी शेअर केल्या असून, त्या अनेकांसाठी धक्कादायक ठरल्या आहेत.

संजय दत्त हे सुनील दत्त आणि नरगिस यांचे सुपुत्र. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वीच त्यांची ओळख तयार झाली होती. यशाबरोबरच आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करूनही त्यांनी आपली सुपरस्टार प्रतिमा कायम राखली आणि आलिशान जीवनशैली जगत राहिले.

वरिंदर चावलांनी सांगितलेल्या आठवणीनुसार, संजय दत्त शूटिंगदरम्यान अनेकदा फोटोग्राफर्सना स्वतःसोबत बसण्याचा आग्रह करायचे. त्यांच्या स्टारडममुळे अनेकजण नकार देऊ शकत नसत. जे लोक दारू पित नसत, तेही दबावामुळे त्यांच्यासोबत बसत असल्याचं त्यांनी सांगितलं.

यासोबतच त्यांनी एक जुना प्रसंगही उघड केला. करिअरच्या सुरुवातीला सेकंड हँड मारुती झेन कार असताना, फिल्मिस्तान स्टुडिओत चुकून त्यांची कार संजय दत्तच्या वॅनिटी व्हॅनला लागली. यानंतर नुकसानभरपाईची चर्चा सुरू झाली. मात्र संजय दत्त यांनी सर्व प्रकार ऐकून आपल्या लोकांना “त्याला जाऊ द्या” असं सांगितलं. त्या क्षणी संजय दत्त यांची माणुसकी आणि समजूतदारपणा अनुभवायला मिळाल्याचं फोटोग्राफरने सांगितलं.

दरम्यान, संजय दत्त सध्या त्यांच्या ‘धुरंधर’ या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहेत. 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 1,200 कोटींची कमाई केली आहे. आता या चित्रपटाच्या पुढील भागासाठी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता असून, लवकरच त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ