Sanjay Dutt : संजय दत्तच्या रेस्टॉरंटमध्ये ‘फिश कॉकटेल’वरून मोठा राडा! प्राणिप्रेमींच्या संतापानंतर अखेर माघार

spot_img

बॉलिवूडचा ‘खलनायक’ संजय दत्त सध्या त्याच्या अभिनयामुळे नव्हे, तर मुंबईत सुरू केलेल्या ‘अल्ता स्टेला’ (Alta Stella) या आलिशान रेस्टॉरंट आणि बारमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. संजयने आपल्या मित्रासोबत सुरू केलेल्या या हॉटेलमधील एका विचित्र ‘कॉकटेल’चा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून, त्यावरून नेटकऱ्यांनी संजू बाबाला जबरदस्त ट्रोल केले आहे. या पेयामध्ये जिवंत माशाचा वापर केल्याचा आरोप करत प्राणिप्रेमी कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शवला, ज्याचा परिणाम म्हणून आता हे ड्रिंक मेन्यू कार्डमधून हटवण्याची वेळ व्यवस्थापनावर आली आहे.

‘अल्ता स्टेला’मध्ये ‘एबीसु कॉकटेल’ नावाचे एक खास पेय सर्व्ह केले जात होते. या ड्रिंकच्या ग्लासमध्ये खालच्या बाजूला एक जिवंत मासा ठेवलेला असायचा आणि वरच्या भागात आग लावून सादरीकरण केले जायचे. संजय दत्तने स्वतः या कॉकटेलची जाहिरात केल्यावर सोशल मीडियावर टीकेची झोड उठली. प्राण्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांनी याला ‘क्रूरता’ संबोधले. “केवळ मनोरंजनासाठी जिवंत जिवाचा असा वापर करणे चुकीचे आहे,” अशा प्रतिक्रिया उमटल्यानंतर संजय दत्त आणि त्याच्या टीमला ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

वाढता वाद पाहून रेस्टॉरंट प्रशासनाने सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या मते, हे कॉकटेल ‘मीन’ राशीच्या संकल्पनेवर आधारित होते आणि त्यात वापरलेला ‘बेट्टा फिश’ हा केवळ दृश्यात्मक सजावटीसाठी (Visual Presentation) वेगळ्या काचेच्या चेंबरमध्ये ठेवला जात असे. ग्राहक फक्त कॉकटेल पितो, माशाचा पेयाशी थेट संबंध नसतो, असे त्यांनी स्पष्ट केले. टोकियो, लंडन आणि न्यूयॉर्कमधील नामांकित बारमध्ये असे प्रयोग होत असले तरी, भारतातील वाढता विरोध लक्षात घेऊन ‘अल्ता स्टेला’ने हे फिश कॉकटेल कायमचे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ