spot_img

Sangli News : सांगलीच्या तासगाव तालुक्यातील गावाने मतदानावर टाकला बहिष्कार

spot_img

सांगली (Sangli) जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीवर तासगाव तालुक्यातल्या बलगवडे येथील ग्रामस्थांनी बहिष्कार घातला आहे. गावामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जवळपास साडेबारा हजार वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. गावातल्या गायरान जमिनीवर राज्य सरकारच्या माध्यमातून सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येतोय मात्र बेकायदेशीर रित्या गावकऱ्यांनी लावलेली झाडांची कत्तल करण्यात आली.

ग्रामस्थांनी सौर ऊर्जा प्रकल्प अन्यत्र हलवावा,या मागणीसाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर गाव बंद ठेवून बहिष्कार घालण्याचा निर्णय केला होता,त्यानुसार आज पार पडणाऱ्या मतदानावर बलगवडे ग्रामस्थांनी कडून बहिष्कार घालण्यात आला आहे. 2300 इतकं मतदान बलगवडे गावात आहेत. दोन मतदान केंद्र नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र दुपार पर्यंत या ठिकाणी एकही मतदान झालेलं नाही.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ