spot_img

Samantha-Raj Nidimoru Wedding : समांथा रूथ प्रभूचा नवा जीवनप्रवास! दिग्दर्शक राज निदिमोरूसोबत बांधली लग्नगाठ

spot_img

30 पाहुण्यांच्या उपस्थितीत साधेपणाने पार पडला विवाह; लाल साडीत समांथा लूकने भारावले चाहते

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेत्री समांथा (Samantha) रूथ प्रभू हिने पुन्हा एकदा वैवाहिक जीवनाची नव्या आठवणींसह सुरुवात केली आहे. 1 डिसेंबर रोजी तिने प्रसिद्ध दिग्दर्शक राज निदिमोरूसोबत विवाह सोहळा थाटात नव्हे तर साधेपणाने, शांत वातावरणात पार पाडला.

ईशा योग केंद्रातील लिंग भैरवी मंदिरात सकाळी त्यांच्या लग्नविधींचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. फक्त 30 जिवलग पाहुण्यांच्या उपस्थितीत झालेला हा सोहळा पूर्णपणे अध्यात्मिक आणि शांततेत रंगला. समांथाचा पारंपरिक लाल साडीतील लूक, केसातील गजरा आणि तिच्या गळ्यातील मंगळसूत्राने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले.

समांथाने इंस्टाग्रामवर आपल्या लग्नाचे खास फोटो ‘01.12.2025’ या कॅप्शनसह पोस्ट केले आणि काही क्षणातच ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. दोघांनी एकमेकांना अंगठी घालताना असलेले फोटो चाहत्यांच्या मनात भरभरून प्रेम जिंकत आहेत. काही दिवसांपासूनच समांथा आणि राज यांच्या नात्याबाबत चर्चेला उधाण आलं होतं, ज्याला आता अधिकृत शिक्का मिळाला आहे.

राज निदिमोरू हा ‘द फॅमिली मॅन'(The Family Man) सारखी सुपरहिट वेब सिरीज देणारा दिग्दर्शक. त्याचे पहिले लग्न श्यामली डे हिच्याशी झाले होते आणि त्यांना एक मुलगी आहे. तर समांथाचे नागा चैतन्यासोबतचे लग्न 2021 मध्ये संपुष्टात आले होते. समांथा आणि राजच्या नव्या प्रवासासाठी चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरूच आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ