spot_img

Salman Khan : संघाच्या ‘संवाद’ कार्यक्रमात सलमान खानला पाहून सगळ्यांच्याच नजरा उंचावल्या

spot_img

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आपल्या शताब्दी वर्षाच्या दिशेने वाटचाल करत असताना, देशभरात विविध वैचारिक आणि सामाजिक उपक्रमांना सुरुवात झालेली आहे. याच अनुषंगाने मुंबईत ‘संवाद’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वरळी (Worli) येथील नेहरू सेंटरमध्ये सुरू झालेली ‘नवे क्षितिज’ ही दोन दिवसांची व्याख्यानमाला संघाच्या विचारधारेला नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने राबवली जात आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी उपस्थितीमुळे सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याने सार्वजनिक व्यासपीठांवर किंवा वैचारिक चर्चांपासून दूर राहणारा सलमान संघाच्या कार्यक्रमात दिसताच सभागृहात एकच चर्चा रंगली. त्याच्या आगमनानंतर माध्यमांचे कॅमेरे त्याच्याकडे केंद्रित झाले, तर उपस्थित मान्यवर आणि चाहत्यांमध्ये त्याला पाहण्याची उत्सुकता स्पष्टपणे दिसून आली. या व्याख्यानमालेतील हा क्षण अनेकांसाठी अनपेक्षित आणि लक्षवेधी ठरला.

या ‘संवाद’ कार्यक्रमात चित्रपटसृष्टीतील इतरही अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला. ज्येष्ठ अभिनेत्री व खासदार हेमा मालिनी, अभिनेता रणबीर कपूर, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई तसेच अभिनेत्री अश्विनी भावे यांची उपस्थिती कार्यक्रमाला विशेष महत्त्व देणारी ठरली. याशिवाय उद्योग, समाजकारण आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तीही या कार्यक्रमासाठी नेहरू सेंटरमध्ये एकत्र आल्या होत्या. या दोन दिवसीय उपक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत उपस्थितांना मार्गदर्शन करत आहेत. ‘नवे क्षितिज’ या संकल्पनेच्या माध्यमातून संघाची भविष्यातील दिशा, समाजातील एकात्मता आणि राष्ट्रनिर्मितीतील नागरिकांची भूमिका या मुद्द्यांवर ते आपले विचार मांडत आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ