spot_img

Salim Merchant : ए. आर. रहमान यांच्या ‘भेदभावाच्या’ आरोपावर सलीम मर्चंटचे सडेतोड उत्तर

spot_img

चित्रपटसृष्टीत खरंच सांप्रदायिक राजकारण चालतं? ऑस्कर विजेत्या संगीतकाराच्या दाव्याने इंडस्ट्रीत दोन गट; मुलीनेही सुनावलं खडेबोल

भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज संगीतकार ए. आर. रहमान यांनी अलिकडेच ‘बीबीसी’ला दिलेल्या एका मुलाखतीत गेल्या ८ वर्षांपासून आपल्याला बॉलिवूडमध्ये काम मिळत नसल्याची खंत व्यक्त केली होती. इतकेच नव्हे तर, यामागे ‘सांप्रदायिक भेदभाव’ कारणीभूत असल्याचे खळबळजनक विधान त्यांनी केले होते. रहमान यांच्या या दाव्यामुळे मनोरंजन विश्वात वादाचे मोहोळ उठले असून, आता प्रसिद्ध संगीतकार सलिम मर्चंट यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सलिम यांच्या मते, चित्रपटसृष्टीला एकाच चष्म्यातून पाहणे चुकीचे असून वैयक्तिक अनुभवावरून संपूर्ण इंडस्ट्रीवर शिक्कामोर्तब करता येणार नाही.

सलीम मर्चंट यांनी रहमान यांच्या आरोपांना खोडून काढताना ‘रामायण’ या आगामी महाप्रकल्पाचे उदाहरण दिले. सलीम म्हणाले की, “जर रहमान यांना भारतीय संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक अशा ‘रामायण’ चित्रपटासाठी संगीत देण्याची संधी मिळते, तर त्यांच्यासोबत धार्मिक भेदभाव होतोय यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. चित्रपटसृष्टी ही प्रतिभेला धर्मापेक्षा जास्त महत्त्व देते.” रहमान यांनी विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाबाबत केलेल्या ‘फूट पाडणारे’ या विधानावरही मोठी टीका झाली होती, ज्यावर नंतर त्यांनी माफीही मागितली होती.

हा वाद उफाळून आल्यानंतर रहमान यांची मुलगी रहीमा हिनेही सोशल मीडियावरून ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे. “लोकांकडे धार्मिक ग्रंथ वाचायला वेळ नाही, पण एकमेकांशी भांडायला आणि शिवीगाळ करायला भरपूर वेळ आहे,” अशा शब्दांत तिने आपल्या वडिलांची पाठराखण केली. बॉलिवूडमधील ‘पॉवर शिफ्ट’ आणि कामाच्या कमतरतेवरून रहमान यांनी व्यक्त केलेली नाराजी आता सिनेसृष्टीतील अंतर्गत वादाचे रूप धारण करत असल्याचे दिसून येत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ