spot_img

Sairat Actor Tanaji Galgunde : सैराटमधील अभिनेता तानाजी गळगुंडेला मित्रांनीच लुटलं; केले मोठे खुलासे

spot_img

सैराट (Sairat) चित्रपटात आर्ची आणि परश्याची लव्ह स्टोरी असली तरी त्यात परश्या, सल्या, लंगड्या यांची मैत्रीही पाहायला मिळाली. चित्रपटात कधीही परश्याची साथ देणारा लंगड्या म्हणजेच अभिनेता तानाजी गळगुंडे ज्याने खऱ्या आयुष्यातही मित्रांवर तितकाच जीव ओतला मात्र त्याच मित्रांनी त्याची फसवणूक केली. सैराटनंतर आपल्याला आपल्या जवळच्याच मित्रांनी लुटलं असं तानाजीने सांगितलं आहे. सैराट चित्रपट एप्रिल 2016 मध्ये रिलीज झाली होती. या फिल्मला आता 10 वर्षे उलटली. या 10 वर्षांनंतर तानाजी गळगुंडेने (Tanaji Galgunde) मोठा खुलासा केला आहे.

तानाजी म्हणाला, सैराट चित्रपटानंतर खरं तर माझ्याकडं चांगले पैसे आले होते. या पैशाचं काय करायचं हे माहिती नव्हतं. आपल्या गावाकडील माणसांचं आर्थिक अज्ञान असतं. त्यावेळी काही मित्र आले, कुणी म्हटलं आपण बिझनेस टाकू, पैसे दे, वाढवून देतो, असं म्हटलं. तर कुणी आपल्याला पैशांची गरज नंतर देतो, असं सांगून पैसे मागून घेतले आणि मी सगळे पैसे त्यांनाच देऊ टाकले. ज्यांनी माझ्याकडून पैसे घेतले ते आता गायब झाले, माझा फोनही उचलत नाहीत, सगळ्यांनी मला ब्लॉक करून टाकलं आहे. मी त्यांना मित्र मानलं होतं, पण ते लोक फक्त पैशासाठी आले होते. त्यांचा दुसरा काहीच उद्देश नव्हता, असं तो म्हणाला. सैराट फिल्मनंतर गेल्या काही वर्षात तानाजीने अनेक वेगवेगळ्या कलाकृती केल्या आहेत. याच काळात झालेल्या आर्थिक प्रगतीनंतर त्याला वाईट अनुभव आला, त्याने एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत हा अनुभव सांगितला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ