spot_img

Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरचा आर्थिक सल्ला, जुनं सोनं विका, देशाची अर्थव्यवस्था बळकट करा

spot_img

टाटा तनिष्कच्या जाहिरातीत मास्टर ब्लास्टरचा संदेश; सोन्याच्या आयातीवर मर्यादा घालण्याचं आवाहन

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) टाटा समूहाच्या तनिष्क या दागिन्यांच्या कंपनीच्या जाहिरातीतून देशवासियांना एक अनपेक्षित आणि महत्त्वाचा आर्थिक सल्ला दिला आहे. त्याने लोकांना आवाहन केलं आहे की, आपलं जुनं सोनं विकून किंवा त्याचा विनिमय करून नवीन दागिने खरेदी करा. यामुळे देशाची अर्थव्यवस्था अधिक सक्षम होईल. सचिनच्या मते, भारत आपलं जवळपास सर्व सोनं परदेशातून आयात करतो, ज्यामुळे देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यावर मोठा ताण येतो. जर नागरिकांनी आपलं जुनं सोनं बाजारात आणलं, तर सोन्याची आयात कमी होऊन देशाचं आर्थिक सामर्थ्य वाढेल. हा संदेश केवळ क्रिकेटप्रेमींसाठीच नाही, तर सोने खरेदी करणारे, गुंतवणूकदार आणि अर्थतज्ज्ञांसाठीही विचार करण्यासारखा आहे.भारत दरवर्षी मोठ्या प्रमाणात सोन्याची आयात करतो, ज्यामुळे व्यापारी तूट वाढते. याचा अर्थ, भारतात येणारं परकीय चलनापेक्षा सोने खरेदीसाठी जास्त रक्कम खर्च होते, ज्यामुळे भारतीय रुपया कमकुवत होतो आणि आयात केलेल्या वस्तूंच्या किमती वाढतात.

भारतात सोनं फक्त दागिना नसून, त्याच्याशी भावनिक नातं जोडलं गेलं आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालानुसार, 2024 मध्ये चीनने 857 टन आणि भारताने 803 टन सोनं आयात केलं, ज्यामुळे हे दोन देश जगातील सर्वात मोठे सोन्याचे आयातदार ठरले. मॉर्गन स्टॅनलीच्या आकडेवारीनुसार, जून 2025 पर्यंत भारतीय कुटुंबांकडे सुमारे 34,600 टन सोनं होतं, ज्याची किंमत तब्बल 320 लाख कोटी रुपये आहे. ही रक्कम भारताच्या एकूण जीडीपीच्या 89% इतकी आहे.पूर्वी भारतीय नागरिक सोनं आणि मुदत ठेवींमध्येच गुंतवणूक करत होते, विशेषतः महागाईशी सामना करण्यासाठी. पण गेल्या दशकात परिस्थिती बदलली आहे. सोनं आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली असून, महागाईही वाढली आहे. यामुळे अनेक भारतीयांनी शेअर बाजार, म्युच्युअल फंड्स, डिजिटल गोल्ड आणि गोल्ड ईटीएफ यांसारख्या नवीन गुंतवणूक पर्यायांकडे आपला मोर्चा वळवला आहे. 2024-25 या कालावधीत शेअर आणि म्युच्युअल फंड्समधील भारतीयांचा सहभाग 15.2% इतका वाढला आहे. सचिनच्या या जाहिरातीतून दिलेला संदेश केवळ आर्थिकच नव्हे, तर देशाच्या प्रगतीसाठी एक पाऊल पुढे टाकण्याचा आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ