spot_img

Russia : जागतिक महासत्तांच्या युद्धात भारत-रशियाची ‘ऑईल डील’ गुप्त!

spot_img

अमेरिकेची ३० दिवसांची विशेष सवलत; रशियाने निर्यात आकडेवारीवर टाकले गोपनियतेचे पडदे

पश्चिम आशियातील इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीने जागतिक ऊर्जा बाजारपेठ हादरली असतानाच, भारत आणि रशियाने एक मोठा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. रशियाने स्पष्ट केले आहे की, ते भारताला पाठवल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाचे नेमके आकडे आता जगासमोर उघड करणार नाहीत. रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी या निर्णयाची पुष्टी करताना सांगितले की, सध्याच्या तणावपूर्ण वातावरणात अनेक देश रशियाच्या व्यापाराला बाधा आणण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे ही माहिती गुप्त ठेवणेच दोन्ही देशांच्या हिताचे आहे.

विशेष म्हणजे, एकीकडे निर्बंधांची भाषा करणाऱ्या अमेरिकेने आता आपल्या भूमिकेत तात्पुरती मऊपणा आणला आहे. अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी भारतीय रिफायनरीजना रशियन तेल खरेदी करण्यासाठी ३० दिवसांची विशेष सवलत जाहीर केली आहे. या सवलतीनंतर रशिया भारताला दर आठवड्याला अंदाजे २.२ कोटी बॅरल तेल पुरवू शकतो, अशा चर्चा आंतरराष्ट्रीय वर्तुळात रंगल्या होत्या; मात्र रशियाने या आकड्यांवर शिक्कामोर्तब करण्यास नकार दिला. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक विस्कळीत झाल्याने रशियाने आता भारत आणि चीनसारख्या आशियाई बाजारपेठांवर आपले पूर्ण लक्ष केंद्रित केले असून, ही भागीदारी जागतिक राजकारणात नवा वळण देणारी ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ