spot_img

Rupali Thombare Patil : रूपाली पाटील ठोंबरेंच्या विरोधात टाकली एक महिलेने पोस्ट, महिलेस केली मारहान ; सोशल मिडीयावर होतोय व्हिडीओ व्हायरल, नेमकं प्रकरण काय ?

spot_img

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombare Patil)आणि महिला प्रदेशाध्यक्ष व महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या दोघींमध्ये चांगलीच जुंपली आहे. रुपाली ठोंबरे पाटील यांनी गुंड पाठवून आपल्याला मारहाण केल्याचा दावा माधवी खंडाळकर यांनी फेसबुक लाईव्ह करुन केला होता. मग या महिलेने पुन्हा हा दावा मागे घेतला होता. आता या महिलेने तिसरा व्हिडीओ टाकला आणि दुसरा व्हिडीओ दबावाखाली बनवला असे म्हटल्याने वादाला ठिणगी फुटली . माधवी खंडाळकर यांना चाकणकर यांनीच फूस लावली असा आरोप करत रुपाली ठोंबरे पाटील यांनी ‘मला अटक करा’ असे म्हणत पोलिस ठाण्यात सिनियर पीआयशी शाब्दीक वाद केल्याचे पुढे आले आहे.

राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी बीडच्या डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणात त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली आणि पीडीत महिलेच्या नातेवाईकांना नेते अजित पवार यांच्याशी फोनवरुन संवाद करुन दिला होता. त्यादरम्यान महिला डॉक्टरच्या नातेवाईकांनी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात अजितदादांकडे नाराजी व्यक्त केली होती. महिला आयोगाच्या अध्यक्षा असूनही रुपाली चाकणकर यांनी संपदा मुंडे यांच्या चारित्र्यांवर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्यावर टीका होत असतानाच आता रुपाली ठोंबरे पाटील यांनी वचपा काढल्याचे समोर आले होते.

रुपाली ठोंबरे पाटील यांनी गुंड पाठवून मारहाण केल्याच्या माधवी खंडाळकर यांनी आरोप केला व त्यांनतर त्यांनी माघार घेतली होती. परंतू दुसरा व्हिडीओ हा त्यांनी दबावाखाली केल्याचे त्यांनी सांगितले. आता या आरोपामागे कोणाचे षडयंत्र आहे हा प्रश्न रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला आहे. रुपाली ठोंबरे पाटील यांनी आरोप करताना असे म्हटले की रुपाली चाकणकर बेजबाबदार व्यक्ती असून चाकणकरांना नाचता येत नाही अंगण वाकडं असे आहे. त्यांना त्या पदाचे गांभीर्य नसते आणि त्यांना चांगलं काम देखील करता येत नाही. चाकणकरांना पहावत नाही, आताचा एक दाखला आहे. रूपाली चाकणकरांनी अशाच काही महिलांचे मानसिक आणि शारीरिक शोषण केले आहे असे त्यांनी सांगितले. त्या महिला पक्ष सोडून देतात. त्यांची पक्षाच्या वरिष्ठांकडे तक्रार सुध्दा केली आहे असेही रुपाली ठोंबरे पाटील यांनी भाष्य केले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ