Rupali Chakankar Resignation : भोंदुबाबामुळे रुपाली चाकणकरांचा राजीनामा; रोहिणी खडसे यांनी सुनावलं

spot_img

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाशी नाव जोडले गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शुक्रवारी रात्री पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांनी हा राजीनामा सुनेत्रा पवार यांच्याकडे पत्राद्वारे पाठवून स्वीकारण्याची विनंती केली.

या प्रकरणामुळे चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासह पक्षातील महत्त्वाचे पद गमवावे लागले आहे. त्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. शरद पवार गटातील नेत्या रोहिणी खडसे यांनी चाकणकर यांच्यावर उपरोधिक भाषेत निशाणा साधत त्यांच्या राजीनाम्यावर टोला लगावला.

तसेच, अजित पवार गटातील रूपाली ठोंबरे पाटील यांनीही चाकणकर यांच्यावर टीका करत हा राजीनामा स्वेच्छेने नसून दबावाखाली घेतल्याचा आरोप केला. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या प्रकरणाची सखोल चौकशी होणार असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, रुपाली चाकणकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावत आपण निर्दोष असल्याचे त्या म्हणाल्या आहेत. खरात यांच्या कोणत्याही गैरव्यवहाराशी आपला संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच तपास निष्पक्ष आणि पारदर्शक व्हावा, अशी मागणीही त्यांनी राज्यातील वरिष्ठ नेतृत्वाकडे केली आहे. सत्य समोर येईल आणि आपण यातून अधिक मजबूत होऊन बाहेर पडू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ