spot_img

Rupali Chakankar vs Rupali Thombre : “राष्ट्रवादीत रूपाली विरुद्ध रूपाली संघर्षाचा शेवट? ठोंबरे यांच्यावर पक्षाचा शिस्तभंगाचा बडगा”

spot_img

अजित पवार गटाने घेतली कठोर भूमिका; प्रवक्त्या रूपाली ठोंबरे यांना नोटीस, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर केलेल्या टीकेचे पडसाद

मागील काही महिन्यांपासून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन महिला नेत्यांमधील वाद चांगलाच चर्चेत होता. प्रदेश प्रवक्त्या रूपाली ठोंबरे (Rupali Thombre) आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तसेच पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यातील मतभेद आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहेत.

रूपाली ठोंबरे यांनी वारंवार रूपाली चाकणकर यांच्या भूमिकेवर आणि महिला आयोगाच्या कामकाजावर उघडपणे टीका केली होती. या सातत्याने होत असलेल्या वक्तव्यांमुळे अखेर पक्षाने शिस्तभंगाची कारवाई करत ठोंबरे यांना नोटीस बजावली आहे. त्यांना आपला खुलासा देण्यासाठी सात दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.

या निर्णयावर प्रतिक्रिया देताना रूपाली ठोंबरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मी सर्व बाबतीत सविस्तर खुलासा देईन हगवणे प्रकरणापासून संपदा मुंडे (Sampada Munde) यांच्या चारित्र्यहननाच्या प्रकरणापर्यंत.”

दरम्यान, काही दिवसांपूर्वी माधवी खंडाळकर नावाच्या महिलेने ठोंबरे यांनी गुंडांच्या माध्यमातून आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप केला होता. नंतर हा दावा तिने मागे घेतला, आणि पुन्हा एका नव्या व्हिडिओत दबावाखाली तो व्हिडिओ केला असल्याचे सांगितल्याने परिस्थिती आणखीनच गोंधळली. ठोंबरे यांनी या सगळ्या प्रकारामागे रूपाली चाकणकर यांचा हात असल्याचा आरोप केला होता.

सध्या या ‘रूपाली विरुद्ध रूपाली’ संघर्षामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ माजली असून पक्षाने ठोस कारवाईची भूमिका घेतल्याने वादाचा पुढचा अध्याय काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ