spot_img

Rupali Chakankar Resigns Maharashtra Women Commission : भोंदू बाबा प्रकरण रुपाली चाकणकरांना भोवले; महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा अखेर राजीनामा

spot_img

‘नुसता राजीनामा नको, सह-आरोपी करा’; ठोंबरे-पाटील, अंधारे आणि वडेट्टीवारांचा चाकणकरांवर बोचरा वार

अशोक खरात याच्या ‘सेक्स स्कँडल’मध्ये पीडित महिलांना न्याय देण्याऐवजी आरोपीला अभय दिल्याच्या गंभीर आरोपांमुळे रुपाली चाकणकर वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी यावर अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. “महिला आयोगाच्या पदाला लागलेली कीड अखेर गेली,” अशा भाषेत त्यांनी चाकणकरांवर टीका केली. तसेच, या गुन्हेगारी कटात सामील असल्याबद्दल चाकणकरांना या प्रकरणात सह-आरोपी करण्याची मागणीही त्यांनी लावून धरली आहे. मुख्यमंत्री आणि महायुतीच्या नेत्यांनी गांभीर्याने दखल घेतल्यामुळेच हा राजीनामा घेण्यात आल्याचा दावा ठोंबरे-पाटील यांनी केला आहे.

दुसरीकडे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनीही चाकणकरांच्या राजीनाम्यावर जोरदार हल्लाबोल केला. वडेट्टीवार म्हणाले की, “राजीनामा देतानाही चाकणकर यांचा माज उतरलेला नाही, त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला नसून ही हकालपट्टी आहे.” पत्रकारांवर दबाव टाकणे आणि पोलिसांकडे तक्रार होऊ न देणे अशा प्रकरणांची चौकशी होऊन यामागील मोठ्या मंत्र्यांचे चेहरे समोर येणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले. सुषमा अंधारे यांनीही “चाकणकर आणि नैतिकतेचा सुतराम संबंध नाही,” असे म्हणत त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत पद वाचवण्याचा प्रयत्न केल्याची टीका केली. दरम्यान, महसूल मंत्री बावनकुळे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून सर्व दोषींना जेरबंद करण्याचे आश्वासन दिले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ