spot_img

Rupali Chakankar : चाकणकर-खरात भेटीवरून अमोल कोल्हेंचा काव्यात्मक प्रहार

spot_img

महिला आयोगाच्या नैतिकतेवर उपस्थित केले प्रश्न

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु अशोक खरात यांचे काही फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वादळासारखे पसरले आहेत. या फोटोंमध्ये चाकणकर या खरात यांच्या चरणी नतमस्तक होताना दिसत असून, यावरून विरोधकांनी त्यांना धारेवर धरले आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) वतीने यावर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या प्रकरणावर फेसबुकच्या माध्यमातून अत्यंत बोचरी आणि वैचारिक टीका केली आहे. महात्मा जोतिराव फुले यांच्या ‘गुलामगिरी’ या ग्रंथाचा संदर्भ देत त्यांनी एक कविता सादर केली. ज्या खुर्चीवर बसून स्त्रियांच्या हक्कांचे रक्षण करायचे, त्याच खुर्चीवरील व्यक्तीने अशा प्रकारे ‘भोंदूगिरी’ला शरण जाणे हा स्त्रीशक्तीचा आणि वैचारिक वारशाचा अपमान असल्याचे कोल्हे यांनी म्हटले आहे. त्यांनी आपल्या कवितेतून चाकणकर यांच्या नैतिकतेवर आणि सामाजिक सीमारेषांवर थेट निशाणा साधला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ