Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांच्या एक्झिटनंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी ‘या’ नेत्याची वर्णी लागणार?

spot_img

भोंदू बाबा प्रकरण रुपाली चाकणकरांना भोवले; जळगावच्या लढवय्या नेत्या प्रतिभा शिंदे यांचे नाव चर्चेत

नाशिकमधील स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात याच्या वादग्रस्त ‘पाद्यपूजा’ प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात नाव आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना अखेर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. यापूर्वीच त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा त्याग केला होता, मात्र आता पक्षांतर्गत पदही सोडावे लागल्याने त्यांच्या राजकीय कारकिर्दीसमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. एसआयटी (SIT) कडून खरातची कसून चौकशी सुरू असतानाच, चाकणकर यांच्या राजीनाम्याने सत्ताधारी पक्षात मोठी खळबळ उडाली असून विरोधकांनीही सरकारला धारेवर धरले आहे.

रुपाली चाकणकर यांच्या जागी आता कोणाची वर्णी लागणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विश्वसनीय सूत्रांनुसार, जळगावमधील आक्रमक नेत्या आणि सध्याच्या प्रदेश प्रवक्त्या प्रतिभा शिंदे यांचे नाव या शर्यतीत सर्वात आघाडीवर आहे. प्रतिभा शिंदे यांनी ‘लोकसंघर्ष मोर्चा’च्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी आणि शोषितांच्या हक्कासाठी दिलेला लढा सर्वश्रुत आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. एक अभ्यासू आणि मैदानी संघर्षाचा अनुभव असलेल्या नेत्या म्हणून प्रतिभा शिंदे यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या नियुक्तीमुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला नवी ऊर्जा मिळेल, अशी चर्चा अजित पवार गटामध्ये रंगली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ