spot_img

RRR Film Animated Version : RRR चित्रपटाचे ॲनिमेटेड व्हर्जन लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला !

spot_img

आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरल्यानंतर चाहत्यांना RRR चित्रपट लवकरच एका वेगळ्याच व्हर्जनमध्ये पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक राजामौली यांनी याबद्दलची घोषणा केली आहे. मात्र अजून याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, दिग्दर्शकांकडून चित्रपटाच्या ॲनिमेटेड कामाला सुरूवात करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. .एसएस राजामौली यांनी दिलेल्या माहितीनुसार, RRR चे संपूर्ण जग आता ॲनिमेटेड असणार आहे. RRR चित्रपटाच्या ॲनिमेटेड व्हर्जनवर काम सुरू झाले आहे. अद्याप घोषणाच झाली असून चित्रपटाच्या एडिटिंगसाठी सुरूवात झालेली नाही.

एसएस राजामौली (S. S. Rajamouli) यांनी दिलेल्या माहितीनुसार, RRR चे संपूर्ण जग आता ॲनिमेटेड असणार आहे. अद्याप याची घोषणाच झाली असून चित्रपटाच्या एडिटिंगसाठी सुरूवात झालेली नाही. प्रेक्षकांमध्ये या बातमीने आनंदाचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे. खरंतर, ॲनिमेटेड चित्रपटांची सर्वात जास्त क्रेझ तरुणाईंमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. RRR ॲनिमेची कल्पना मूळ चित्रपटाची कथा नवीन स्वरूपात सादर करण्यासाठी, विशेषतः तरुण प्रेक्षकांसाठी आणि अ‍ॅनिमेशन प्रेमींसाठी एक मोठे पाऊल म्हणून पाहिली जाते. अद्याप RRR ॲनिमी चित्रपटाच्या रिलीज डेटबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. राम चरण (Ram Charan) आणि ज्युनियर एनटीआर यांच्या मुख्य भूमिकेतील जोडीने चित्रपटाला आधीच एक वेगळी ओळख दिली आहे. आता ही जोडी ॲनिमेटेड व्हर्जनमध्येही चाहत्यांची मने जिंकू शकते.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ