Rohit Pawar : प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंनी पक्षाचे ‘संविधान’ बदलल्याचा रोहित पवारांचा खळबळजनक दावा

spot_img

अल्पसंख्याक आणि ओबीसी सेलला डच्चू? सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेसमधील सत्तासंघर्ष आता पक्षाच्या ‘संविधाना’पर्यंत पोहोचला असून, आमदार रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप करत नवा राजकीय बॉम्ब फोडला आहे. रोहित पवारांच्या दाव्यानुसार, या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या मूळ संविधानात परस्पर मोठे बदल केले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, पक्षाचा कणा मानले जाणारे अल्पसंख्याक सेल, सामाजिक न्याय सेल आणि ओबीसी सेल नवीन संविधानातून पूर्णपणे काढून टाकण्यात आले आहेत. जुन्या संविधानात असलेल्या ७ फ्रंटल सेलऐवजी आता केवळ युवक, विद्यार्थी, महिला आणि सेवादल यांचाच उल्लेख उरला असल्याचे पवारांनी म्हटले आहे.

रोहित पवारांनी केवळ आरोपच केले नाहीत, तर या वादात आता सुनेत्रा पवार यांचीही एन्ट्री झाल्याचे सांगितले आहे. संविधानातील हे बदल समजताच सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून हे सर्व बदल तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे, असा दावाही रोहित पवारांनी केला. अजित पवारांच्या अपघातानंतर रोहित पवार हे पटेल आणि तटकरे या जोडगोळीवर कमालीचे आक्रमक झाले असून, पक्षाला वैचारिकदृष्ट्या कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे ते सुचवत आहेत. या नवीन खुलाशामुळे अजितदादांच्या गटात अंतर्गत ‘चेकमेट’चे राजकारण सुरू असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ