spot_img

Rohit Pawar : अजित पवारांच्या अपघात प्रकरणी संसदेत आवाज उठवण्याची मागणी; रोहित पवारांनी घेतली केजरीवालांची भेट

spot_img

संजय सिंह आणि अरविंद केजरीवाल यांना दिली तपासाची माहिती; डीजीसीएच्या चौकशीवर उपस्थित केले प्रश्न.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी, यासाठी दिल्लीमध्ये विविध नेत्यांची भेट घेतली. महाराष्ट्र विधानसभेनंतर आता संसदेतही हा मुद्दा उपस्थित व्हावा, अशी त्यांची मागणी आहे.

दिल्ली दौऱ्यात रोहित पवार यांनी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांची भेट घेतली आणि राज्यसभेत हा विषय मांडण्याची विनंती केली. लोकांच्या हितासाठी संसदेत आवाज उठवणाऱ्या खासदारांना या घटनेची माहिती देत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, व्हीएसआर कंपनीविरोधात अद्याप एफआयआर नोंदवला गेला नसल्याचा आरोप करत या प्रकरणात न्याय मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली.

यावेळी रोहित पवार यांनी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) अहवालावरही प्रश्न उपस्थित केले. या अपघाताची चौकशी नियम क्रमांक 12 अंतर्गत व्हावी आणि तपास प्रक्रियेत अधिक पारदर्शकता असावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, एका केंद्रीय मंत्र्यांचे आणि टीडीपीशी संबंधित नेत्यांचे व्हीएसआर कंपनीच्या मालकांशी जवळचे संबंध असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला. त्यामुळे निष्पक्ष चौकशीसाठी संबंधित नेत्यांना मंत्रिमंडळातून दूर ठेवावे आणि तपास अधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ