spot_img

Rohit Patil NCP: रोहित पाटील यांना राष्ट्रवादीत मिळणार मोठी जबाबदारी?

spot_img

शरद पवार गटात संघटनात्मक बदलांचे वारे, दत्तामामा भरणे यांची धाराशिव संपर्कमंत्री म्हणून नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षात लवकरच मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे. सूत्रांनुसार, माजी गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील (R.R.Patil) उर्फ आबा यांचे सुपुत्र रोहित पाटील (Rohit Pawar) यांना युवक प्रदेशाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. सध्या मेहबूब शेख (Mehboob sheikh) हे या पदावर कार्यरत असून, त्यांच्या आक्रमक नेतृत्व शैलीसाठी ते ओळखले जातात. मात्र, तळागाळातील जनतेशी थेट संपर्क आणि संयत स्वभावासाठी प्रसिद्ध असलेल्या रोहित पाटील यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली जाण्याची चर्चा आहे. पक्षाच्या आगामी बैठकीत याबाबत अंतिम निर्णय होण्याची अपेक्षा आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाला केवळ 10 जागांवर यश मिळाले. यामध्ये रोहित पाटील (Rohit Pawar) यांनी तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून 1,26,478 मते घेत संजयकाका पाटील यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला पराभूत केले. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी आमदार बनलेले रोहित हे देशातील सर्वात तरुण आमदारांपैकी एक आहेत. कायद्याचे पदवीधर असलेल्या रोहित यांच्याकडे वडिलांप्रमाणेच लोकांशी संवाद साधण्याची आणि त्यांच्यात मिसळण्याची कला आहे.

गेल्या काही वर्षांत त्यांनी तरुण आणि आश्वासक नेते म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षातही हालचाली सुरू आहेत. राज्याचे कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांची धाराशिव जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून नियुक्ती झाली आहे. पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी ही जबाबदारी भरणे यांच्यावर सोपवली आहे. यामुळे धाराशिव जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ