spot_img

Ray-Ban Meta AI  : Ray-Ban आणि Meta यांचा नवा टेक चष्मा भारतात दाखल, AI स्मार्ट ग्लासेसचा नवा अनुभव

spot_img

व्हॉइस कमांड, 3K व्हिडिओ, मराठी-हिंदी सपोर्ट आणि UPI पेमेंटची तयारी; किंमत 39,900 रुपयांपासून

Ray-Ban आणि Meta यांनी एकत्र येत भारतात Ray-Ban Meta (Gen 2) AI स्मार्ट चष्मे अधिकृतपणे लॉन्च केले आहेत. दैनंदिन आयुष्य अधिक स्मार्ट, सोपं आणि स्टायलिश बनवणारे हे अत्याधुनिक चष्मे आता भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध झाले आहेत. फॅशन आणि टेक्नॉलॉजीचा सुरेख मिलाफ असलेले हे स्मार्ट ग्लासेस Ray-Ban India चे अधिकृत स्टोअर्स आणि प्रमुख आयवेअर रिटेलर्सकडे विक्रीस आले असून त्यांची सुरुवातीची किंमत 39,900 रुपये आहे.

पहिल्या जनरेशनला मिळालेल्या यशानंतर Gen 2 मॉडेलमध्ये मोठ्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये 3K अल्ट्रा HD व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधा देण्यात आली असून व्हिडिओ अधिक स्पष्ट, स्थिर आणि रंगसंपन्न मिळतात. अल्ट्रावाइड HDR सपोर्टमुळे उजेड, सावल्या किंवा वेगवान हालचाली असतानाही व्हिडिओची गुणवत्ता कायम राहते. पुढील सॉफ्टवेअर अपडेट्सद्वारे हायपरलॅप्स आणि स्लो मोशन मोड्सही उपलब्ध होणार आहेत, ज्यामुळे कंटेंट क्रिएटर्ससाठी हे चष्मे अधिक आकर्षक ठरणार आहेत.

या स्मार्ट चष्म्यांमध्ये सुमारे 8 तासांची बॅटरी लाइफ देण्यात आली आहे. फक्त 20 मिनिटांत 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होणारी फास्ट चार्जिंग सुविधा असून, चार्जिंग केसद्वारे तब्बल 48 तासांची अतिरिक्त पॉवर मिळते. सतत प्रवास, शूटिंग किंवा दिवसभर वापर करणाऱ्यांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त आहे.

Ray-Ban Meta Gen 2 हे तीन लोकप्रिय डिझाईन्समध्ये उपलब्ध आहेत – क्लासिक Wayfarer, मॉडर्न Skyler आणि Headliner. याशिवाय Cosmic Blue, Mystic Violet आणि Asteroid Grey असे आकर्षक रंग पर्यायही देण्यात आले आहेत. त्यामुळे स्टायलिश लूकसोबत स्मार्ट फीचर्स हवे असणाऱ्यांसाठी हे चष्मे एक उत्तम पर्याय ठरतात.

या चष्म्यांमधील Meta AI आता अधिक प्रगत बनला आहे. “Hi Meta” असं म्हटलं की वेळ जाणून घेणं, सूचना मिळवणं, माहिती शोधणं, आयडिया सुचवणं किंवा फोटो-व्हिडिओ कॅप्चर करणं यासारखी कामं सहज करता येतात. विशेष म्हणजे आता Meta AI ला हिंदी आणि मराठी भाषांचा पूर्ण सपोर्ट मिळाला आहे, ज्यामुळे भारतीय वापरकर्त्यांसाठी संवाद अधिक सुलभ झाला आहे.

नवीन अपडेटमध्ये सेलिब्रिटी AI व्हॉइस फीचरही जोडण्यात आलं आहे. वापरकर्ते आता अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या आवाजातील AI सोबत संवाद साधू शकतात. भविष्यात आणखी प्रसिद्ध आवाज जोडले जाण्याची शक्यता मेटाने व्यक्त केली आहे.

याशिवाय, लवकरच या AI चष्म्यांमधून UPI Lite पेमेंट्सची सुविधाही सुरू होणार आहे. चष्मा घालून QR कोडकडे पाहत “Hi Meta, scan and pay” असं म्हटलं की थेट पेमेंट पूर्ण होईल. फोन काढण्याची गरज न पडता WhatsApp लिंक असलेल्या बँक खात्यातून व्यवहार करता येणार आहे. दैनंदिन व्यवहार अधिक जलद आणि सोपे करण्याच्या दृष्टीने हे एक मोठं पाऊल मानलं जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ