spot_img

Ravindra Dhangekar : धंगेकरांचा समीर पाटलांवर जोरदार हल्लाबोल, निलेश घायवळ प्रकरणात भाजपला धक्का

spot_img

शिवसेना नेते रवींद्र धंगेकर पुण्यात राजकीय रिंगणात उतरले; दिवाळीनंतर मोठा मोर्चा,

पब-ड्रग्सचा काळंबेर उघडणार पुण्यातील गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaiwal) प्रकरणाने राजकीय वातावरण तापले असून, शिवसेना (शिंदे गट) नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी समीर पाटलांवर (Samir Patil) गुन्हा दाखल न झाल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे. निलेश घायवळच्या अटकेआधी लढा थांबणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. यामुळे पुण्यात शिंदे सेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष तीव्र होत असून, ठाणे-नवी मुंबईनंतर आता पुण्यातही दोन्ही पक्षांमध्ये मोठा टकराव अपेक्षित आहे.दिवाळीच्या सुट्यांमुळे सध्या न्यायालय आणि वकील मंडळींची कामे बंद असल्याने, सुट्ट्या संपल्यानंतर प्रक्रिया पुढे नेहणार, असे धंगेकर म्हणाले. समीर पाटलांचा मुद्दा सोडवणार नाहीत; घायवळ सापडला नाही आणि समीर पाटलांवर गुन्हा दाखल झाला नाही तोपर्यंत मी चुपचाप बसणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

समीर पाटल हे केवळ सहायक नव्हते, तर शहरातील पब संस्कृतीपासून ड्रग्सच्या अर्थकारणापर्यंतच्या साखळीचे नियोजक आहेत, असे सांगत धंगेकर यांनी मोठा खुलासा केला. त्यांना मी प्रत्युत्तर देईनच, असेही त्यांनी स्पष्ट केले. समीर पाटलांनी धंगेकरांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाईची धमकी दिली होती, त्यावर धंगेकर म्हणाले, “मी तयार आहे, येईल तर येईल!”निलेश घायवळ अद्याप फरार असल्याने पोलिसांवर मोठे अपयश झाले आहे, असे धंगेकर यांनी सांगितले. जर मी आवाज नसता उठवला असता, तर हे गुन्हे दाखलही झाले नसते. मी बोलल्यामुळे माझ्यावर ७-८ गुन्हे दाखल झाले, पण शहरातील दरोडेखोरी थांबवण्यासाठी मी लढत राहीन, असा त्यांचा निर्धार आहे.

भाजपच्या मंत्र्यांविरुद्ध धंगेकर यांनी नुकतेच ट्विट केले होते, ज्यामुळे पक्षांमधील तणाव वाढला आहे. यावर बोलताना त्यांनी “पुणेकरांसोबत आहेत, म्हणून लढतोय” असा अप्रत्यक्ष इशारा दिला.शिवसेना शिंदे गटाचे हे नेते आता भाजपविरोधात आक्रमक झाले आहेत. निलेश घायवळची दादागिरी, खोटे पासपोर्ट करून लोकांचे हाल होणे किंवा समीर पाटलांसारखे लोक हे सर्व चंद्रकांत पाटलांच्या जवळ असल्याने धाडस करतात, असा गंभीर आरोप धंगेकर यांनी यापूर्वी केला होता. पुण्यात आता त्यांनी भाजपविरुद्ध थेट मोर्चा उघडला असून, लवकरच पत्रकार परिषद घेणार आहेत. या परिषदेत ते आणखी कुठल्या आरोपांची धुंडाळणार, गुप्त माहिती उघडणार आणि भाजप नेत्यांवर काय टीका करणार, याकडे पुणेकरांची उत्सुकता आहे. हे प्रकरण आता राजकीय रंगणार की न्यायाच्या दिशेने पुढे जाईल, हे पाहावे लागेल.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ