spot_img

Ravindra Chavan : विलासराव देशमुख यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर चव्हाणांनी व्यक्त केली दिलगिरी

spot_img

लातूरमध्ये भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस (Congress) कार्यकर्ते संतप्त झालेत. लातूरकरांचा उत्साह पाहून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील, याची खात्री पटल्याचं वक्तव्य रवींद्र चव्हाणांनी केलेलं. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळाली. त्यातच रवींद्र चव्हाणांनी विलासराव देशमुखांबाबत केलेल्या वक्तव्यावर दिवंगत नेते विलासराव देशमुखांचा मुलगा आणि अभिनेता रितेश देशमुखनं आपली प्रतिक्रिया दिली. लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात, लिहीलेलं पुसता येत, कोरलेलं नाही, असं रितेश देशमुख म्हणाला. अशातच आता काँग्रेस नेत्यांचा रोष आणि रितेश देशमुखांच्या खरमरीत प्रत्युत्तरानंतर रवींद्र चव्हाणांनी सपशेल दिलगिरी व्यक्त केली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की, “लातुरमध्ये मी जे काही म्हटलं, मी विलासरावांवर जराही, कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांच्या टिकाटिप्पणी केलेली नाही. विलासराव खूप मोठे नेते होते. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलंय. लातुरात विलासरावांवरच फोकस ठेवून काँग्रेस तिथे मतदान मागतंय, त्यामुळे त्याठिकाणी आता नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात झालेलं काम, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी विकासात्मक दृष्टीकोनातून झाल्यात. यासंदर्भात मी तसं म्हटलं, पण तरीसुद्धा त्यांचे चिरंजीव, जे माझे अत्यंत चांगले मित्र आहेत, त्यांच्या भावना दुखावल्या असतील, तर मी नक्कीच त्यांची दिलगिरी व्यक्त करतो… तुम्ही राजकीयदृष्ट्या याकडे पाहू नका, एवढं मी त्यांच्या चिरंजीवांना सांगेन…”

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ