रत्नागिरीतील लांजा तालुक्यात सायंकाळी अचानक वातावरण बदलून पावसाच्या सरी कोसळल्या. आरगाव, व्हेळ रिंगणे, कुरंग, वीलवडे या भागांमध्ये या पावसाचा विशेष प्रभाव दिसून आला.
या अनपेक्षित पावसामुळे ग्रामीण भागातील आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत. आधीच यंदा आंब्याचा मोहोर कमी असल्याने उत्पादन घटले होते. त्यातच या अवकाळी पावसामुळे झाडांवरील फळे गळून पडली असून मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातात येऊ घातलेले उत्पन्न अक्षरशः निसटल्याची भावना व्यक्त होत आहे. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असला तरी आंबा बागायतदारांसाठी हा दिलासा नसून मोठा आर्थिक फटका ठरला आहे.




