साऊथ सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडपे रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा 26 फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये धार्मिक विधीनुसार विवाहबंधनात अडकले. शाही पद्धतीने पार पडलेल्या या लग्न सोहळ्यात जवळचे मित्र, कलाकार आणि काही बिझनेसमॅन उपस्थित होते. लग्नानंतर दोघांनी इन्स्टाग्रामवर आनंदाचे फोटो शेअर केले. रश्मिकाचा सासरी जात असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लग्नानंतर शुक्रवारी जोडपे विजय देवरकोंडाच्या हैदराबादमधील घरी पोहोचले. रश्मिकाचे स्वागत तिच्या सासू-सासऱ्यांनी प्रेमाने केले; विजयच्या आईने हात धरून सुनेचे स्वागत केले.
शाही लूक आणि रिसेप्शनची तयारी
उदयपूरहून निघताना रश्मिकाने लाल अनारकली ड्रेस घातला होता. सिंपल मेकअप, मंगळसूत्र, भांगेत कुंकू आणि हातात बांगड्या. तर विजयने रेशमी कुर्ता-पायजमा परिधान केला होता आणि त्याचा लूकही साधा पण आकर्षक होता.
लग्नानंतर, 4 मार्चला त्यांच्या रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. या रिसेप्शनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काही दिग्गज कलाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे. सोशल मीडियावर दोघांचा आनंद आणि शाही लूक चर्चेचा विषय ठरत आहे, तर चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.




