spot_img

Ranveer Deepika Baby : दीप-वीरनं पहिल्यांदा शेयर केला लेक ‘दुआ’ चा फोटो !

spot_img

‘दुआ’ च्या फोटोनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय

बॉलीवूडचं लोकप्रिय कपल रणवीर सिंग व दीपिका पदुकोण यांनी ८ सप्टेंबर म्हणजेच गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर मुलीला जन्म दिला होता. आई-बाबा झाल्याची गुडन्यूज त्यांनी सोशल मीडियावरुन आपल्या सर्व चाहत्यांसह शेअर केली होती. दोघांनीही सोशल मीडियावर खास पोस्ट करत त्यांच्या घरात एका गोंडस मुलीचा जन्म झाल्याचं चाहत्यांना सांगितलं होतं.अशातच आता दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर दीप-वीरनं आपल्या चाहत्यांना आणखी एक गोड सरप्राईज दिलं आहे. या जोडप्यानं त्यांची मुलगी दुआ पादुकोन-सिंहचा (Dua Padukone-Singh) पहिला फोचो सोशल मीडियावर शेअर केला आहे. दीपिका आणि रणवीरनं दुआसोबतचे फोटो शेअर करताच सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात आला.

रणवीर-दीपिकाची (Ranveer-Deepika) लेक नेमकी कोणासारखी दिसते याबद्दल गेल्या वर्षभरापासून सोशल मीडियावर चर्चा सुरू होती. दुआला पाहण्यासाठी सगळेच उत्सुक होते. अखेर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दीपिकाने इन्स्टाग्रामवर फॅमिली फोटो शेअर केला आहे. यामध्ये चिमुकल्या दुआने आईबरोबर ट्विनिंग केल्याचं पाहायला मिळत आहे.दीपिकाची लाडकी लेक पारंपरिक लूकमध्ये तयार झाल्याचं या फोटोंमध्ये पाहायला मिळतंय. लाल रंगाचा सुंदर ड्रेस, क्युट हेअरस्टाइल, लाल रंगाची छोटीशी टिकली या लूकमधये बेबी दुआ खूपच क्युट दिसतेय. तर रणवीर सिंहने या मायलेकींना कॉन्ट्रास्ट मॅचिंग होईल अशी ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी घातल्याचं या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.

दिवाळीच्या खास प्रसंगी शेअर केलेल्या या फोटोमध्ये दुआ ट्रेडिशनल अंदाजात दिसली. फोटोमध्ये दुआ आणि तिचे आई-वडील दिवाळीनिमित्त एकत्र पूजा करताना दिसले. रणवीर आणि दीपिकानं फोटोला कॅप्शन दिलं आहे, ‘दिवाळीच्या शुभेच्छा’. या फोटोनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. चाहत्यांनी कमेंटमध्ये प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव केला. काहींनी दुआला ‘छोटी परी’ असं म्हटलं, तर काहींनी रणवीर आणि दीपिकाला ‘सुपर मॉम अँड सुपर डॅड’ असं म्हणत अभिनंदन केलं.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ