spot_img

Rani Mukerji Trolled Over Reaction On Domestic Problems : पती-पत्नीच्या नात्यावर केलेल्या विधानामुळे राणी मुखर्जीची सापडली वादाच्या भोवऱ्यात

spot_img

‘मर्दानी 3’च्या प्रमोशनदरम्यान राणी मुखर्जीचं वक्तव्य वादात; सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukherji) सध्या तिच्या आगामी चित्रपट ‘मर्दानी 3’ (Mardaani 3) मुळे चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत राणीने केलेल्या वक्तव्यामुळे मात्र ती सध्या सोशल मीडियावर टीकेचा धनी ठरत आहे. पती-पत्नीच्या नात्याविषयी केलेली तिची टिप्पणी सध्या वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रचंड व्हायरल होत आहे.

त्या मुलाखतीत बोलताना राणी म्हणाली की, समाजातील आदराची सुरुवात ही घरातूनच होते. एखादा मुलगा जर आपल्या आईला वाईट वागणूक मिळताना पाहतो, तर त्याच्या मनात इतर स्त्रियांबद्दलही तशीच वागणूक देण्याची मानसिकता तयार होऊ शकते, असं तिने मत व्यक्त केलं. पुरुषांनी आपल्या पत्नीशी कसं वागायचं याची जबाबदारी घेतली पाहिजे, कारण त्याच वागणुकीचा प्रभाव मुलांच्या मनावर होत असतो, असंही तिने स्पष्ट केलं.

राणीच्या मते, आईला आदर आणि सन्मान मिळत असेल, तर मुलांमध्येही महिलांबद्दल आदरभाव निर्माण होतो. मात्र, याच चर्चेदरम्यान तिने केलेलं एक विधान अनेकांना खटकलं. वडील जर आईवर ओरडत असतील, तर ते चुकीचं आहे, आणि अशा वेळी आईनेही त्याला प्रत्युत्तर द्यायला हवं, असं वक्तव्य राणीने केलं.

या वक्तव्यामुळेच राणी मुखर्जी सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहे. तिची ही क्लिप सध्या मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात असून नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी राणीचा हा सल्ला चुकीचा असल्याचं मत मांडलं आहे. काही युजर्सनी हे विधान ‘मजेशीर पद्धतीने सांगितलं असावं’ असं म्हटलं असलं, तरी अशा गंभीर विषयावर विनोद योग्य नाही, अशी टीकाही करण्यात आली आहे.

तर काही नेटकऱ्यांनी कोणत्याही नात्यात ओरडणं हा उपाय नाही, तर शांतपणे संवाद साधणं हाच योग्य मार्ग असल्याचं मत व्यक्त केलं आहे. पती-पत्नीचं नातं हे परस्पर आदर, समजूतदारपणा आणि संवादावर आधारित असावं, असं अनेकांचं म्हणणं आहे. एकूणच, राणी मुखर्जीच्या या वक्तव्यावर सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आणि टीका सुरू आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ