spot_img

Ramya post Controversy : अभिनेत्री राम्याचं वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात; भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावरून पुरुषांविषयी विधान चर्चेत

spot_img

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरची इंस्टाग्राम पोस्ट ठरली वादग्रस्त, सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया

कन्नड चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि माजी महिला खासदार राम्या या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या राम्या यांचं एक ताजं वक्तव्य सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यातून पुरुषांचा अपमान केल्याचा आरोप काही नेटकऱ्यांकडून केला जात आहे.

हा संपूर्ण प्रकार भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावरून समोर आला आहे. 7 जानेवारी 2026 रोजी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती विक्रम नाथ, संदीप मेहता आणि एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने भटक्या कुत्र्यांमुळे सार्वजनिक सुरक्षेला निर्माण होणाऱ्या धोक्याबाबत चिंता व्यक्त केली होती.

न्यायालयाने स्पष्ट केलं की, कोणता कुत्रा हल्ला करेल आणि कोणता करणार नाही, हे आधीच सांगणं अशक्य आहे. कुत्र्यांचा मूड कधी बदलतो, याचा अंदाज कोणालाही येत नाही. रस्ते, शाळा, रुग्णालये, रेल्वे स्थानके आणि इतर सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांची उपस्थिती धोकादायक ठरू शकते. कुत्र्यांच्या चाव्याव्यतिरिक्त अपघातांचाही धोका असल्याचं न्यायालयाने नमूद केलं. यामुळे अशा ठिकाणांना कुत्र्यांपासून मुक्त ठेवण्यावर भर देण्यात आला असून, पकडलेल्या कुत्र्यांना त्याच ठिकाणी परत सोडण्याच्या आधीच्या आदेशात बदल करण्यात आला.

या निर्णयानंतर राम्या यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की, “पुरुषांची मानसिकताही आधीच ओळखता येत नाही. कोणता पुरुष कधी बलात्कार करेल किंवा खून करेल, हे सांगणं शक्य नाही. मग याचा अर्थ सगळ्याच पुरुषांना तुरुंगात टाकायचं का?”

राम्या यांच्या या विधानाचा उद्देश असा होता की, एखाद-दुसऱ्या घटनेमुळे संपूर्ण गटाला दोषी ठरवणं योग्य नाही. जसं काही कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे सर्वच कुत्र्यांना दोषी धरता येत नाही, तसंच काही नराधमांमुळे सर्व पुरुषांना दोषी ठरवणंही चुकीचं आहे, असं त्या म्हणाल्या.

मात्र, ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेक नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. काहींनी पुरुषांची तुलना कुत्र्यांशी केल्यामुळे हे वक्तव्य अपमानास्पद असल्याचं म्हटलं, तर काहींनी राम्या यांच्यावर सर्व पुरुषांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. सध्या हे वक्तव्य सोशल मीडियावर जोरदार चर्चेचा विषय ठरत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ