spot_img

Ram Charan : विजय-रश्मिकाच्या रिसेप्शनमध्ये अनवाणी पोहोचला सुपरस्टार राम चरण; साध्या लूकमागील ‘हे’ आहे आध्यात्मिक कारण!

spot_img

उदयपूरमधील शाही विवाहानंतर हैदराबादमध्ये पार पडला सोहळा; राम चरणच्या ‘अय्यप्पा दीक्षे’ची सोशल मीडियावर चर्चा

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील ‘मोस्ट लव्हड’ कपल विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांचा विवाह सोहळा २६ फेब्रुवारीला उदयपूरमध्ये थाटामाटात पार पडल्यानंतर, ४ मार्च रोजी हैदराबादमध्ये त्यांच्या लग्नाचे भव्य रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते. या सोहळ्याला चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली, मात्र सर्वांच्या नजरा सुपरस्टार राम चरणवर खिळल्या होत्या. राम चरण आपल्या पत्नीसह या सोहळ्याला अतिशय साध्या आणि पारंपरिक काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये पोहोचला होता, पण विशेष म्हणजे तो ‘अनवाणी’ (पायात चप्पल न घालता) आला होता. ग्लॅमरस जगात वावरणाऱ्या या सुपरस्टारला अशा अवस्थेत पाहून उपस्थित पाहुणे आणि चाहत्यांच्या भुवया उंचावल्या, मात्र यामागे एक अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक कारण असल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राम चरण सध्या ‘स्वामी अय्यप्पा’ यांची कडक ‘मदला दीक्षा’ पाळत आहे. केरळमधील सबरीमाला तीर्थयात्रेपूर्वी भक्त ४१ दिवसांचे हे अत्यंत कठीण व्रत करतात. या काळात काळे किंवा निळे कपडे परिधान करणे, ब्रह्मचर्याचे पालन करणे, सात्विक आहार घेणे आणि जमिनीवर झोपणे असे कडक नियम पाळावे लागतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या पूर्ण काळात भक्ताला अनवाणी राहावे लागते. आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून आणि स्टारडमची पर्वा न करता राम चरण या आध्यात्मिक शिस्तीचे पालन करत असल्याने सोशल मीडियावर त्याचे कौतुक होत आहे. या व्रतामुळेच तो लग्नाच्या रिसेप्शनमध्येही चप्पल न घालता सहभागी झाला होता, ज्याचे फोटो आता तुफान व्हायरल होत आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ