spot_img

Rakhi Sawant : मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ‘त्या’ कृत्यावर भडकली राखी सावंत

spot_img

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्यावर सध्या सर्व स्तरांतून टीका होत आहे. ती पाटणामध्ये झालेल्या कार्यक्रमातील एका प्रकारामुळे. बिहारची राजधानी पाटणा येथे आयोजित एका सरकारी सन्मान सोहळ्याने अचानक मोठा राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण केला. राज्य सचिवालयात झालेल्या या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित असताना, मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी महिला डॉक्टर महिलेचा हिजाब हटवल्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि त्यानंतर या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. या घटनेवर मनोरंजन सृष्टीतीलही अनेकांच्या प्रतिक्रिया आल्यानंतर आता आपल्या वादग्रस्त विधानांनी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर संतापल्याचे दिसलं.

“नमस्कार नितीश कुमारजी. चरण स्पर्श. तुमचा हात आशीर्वादासाठी कायम माझ्या डोक्यावर असू देत. मी तुमचा आदर करते तुमच्यावर प्रेम करते. तुम्ही खूप चांगले नेते आहात. चांगले पिता आणि पती आहात. पण, तुम्ही हे काय करून बसलात नितीशजी? तुम्ही हे काय केलं? एका मुस्लिम महिलेला तुम्ही बोलवून अवॉर्ड देत आहात, तिला सन्मानित करत आहात, तिला आदर देताय पण तुम्हाला पाच पैशाचं ज्ञान नाही की मुस्लिम धर्मात एखादी महिला घालून जेव्हा जाते तेव्हा तिच्या नकाबला कुणी हात लावू शकत नाही.

इतके दिग्गज नेते आहात तुम्ही. तुम्ही इतके माननीय आहात. मी तुमचा आदर करते. हे तुम्ही काय करून बसलात? तुम्ही एका महिलेचा, एका मुस्लिम महिलेचा नकाब ओढताय. किती चुकीची गोष्ट आहे ही नितीशजी. मी तुमचा इतका आदर करते. तुमच्यावर प्रेम करते. तुम्ही असे प्रकार करत आहात. जर मी तुमच्यापाशी आले आणि सगळ्यांसमोर तुमचं धोतर खेचलं, तुमच्या पॅन्टचा नाडा ओढला तर चालेल का? तुम्ही एका महिलेला इज्जत देता आणि लगेच तिची इज्जत काढून घेता. तुम्हाला लाज वाटत नाही का? तुम्ही माझे फेवरेट नेते आहात. पण तुम्ही काय वागून बसलात मुस्लिम महिलेसोबत. ही चुकीची गोष्ट आहे.तुम्ही त्या महिलेची माफी मागितली पाहिजे. मीडियासमोर त्या महिलेला बहिणीच्या नात्याने बोलवून तिची माफी मागा. मी तुमचा आदर करते. मी यूपी बिहारचाही आदर करते. पण एखादा महिलेसोबत होणारा अत्याचार अन्याय, खास करून तिच्या बुरख्यासोबत केली जाणारी छेडछाड मी कदापि सहन करणार नाही. तुम्ही आधी माफी मागा.” असं राखी सावंत म्हणाली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ