spot_img

Rajpal Yadav : ‘भूत बंगला’चा नवा पोस्टर रिलीज; अक्षय कुमारचा हटके अवतार पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढली

spot_img

हॉरर-कॉमेडीत अक्षय कुमार, राजपाल यादव पुन्हा एकत्र; चित्रपट 10 एप्रिल 2026 रोजी होणार प्रदर्शित.

बॉलिवूडमधील आगामी हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘भूत बंगला’बद्दल प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे अभिनेता राजपाल यादव अलीकडील वादांनंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार असल्यामुळे चाहत्यांचे लक्ष या चित्रपटाकडे लागले आहे. दरम्यान, चित्रपटाचा नवीन पोस्टर रिलीज करण्यात आला असून तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

बालाजी मोशन पिक्चर्सने नुकताच ‘भूत बंगला’चा नवीन पोस्टर चाहत्यांसमोर आणला आहे. या पोस्टरमध्ये अभिनेता अक्षय कुमार एका वेगळ्याच अंदाजात दिसतो. पोस्टरमध्ये तो झाडाच्या फांदीला उलटा लटकलेला असून त्याच्या चेहऱ्यावर विनोदी पण थोडासा भीतीदायक असा भाव दिसतो. पार्श्वभूमीला अंधारे जंगल आणि उडणारी वटवाघळे दिसत असल्यामुळे चित्रपटात हॉरर आणि कॉमेडीचा अनोखा संगम पाहायला मिळणार असल्याचे संकेत मिळतात.

‘भूलभुलैया’नंतर अक्षय कुमार आणि राजपाल यादव यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. याशिवाय अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन ही हिट जोडीही या चित्रपटातून पुन्हा एकत्र आली आहे. यापूर्वी या दोघांनी अनेक लोकप्रिय कॉमेडी चित्रपट दिले आहेत.

बालाजी मोशन पिक्चर्स आणि केप ऑफ गुड फिल्म्सच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटात अक्षय कुमारसोबत वामिका गब्बी, परेश रावल, तब्बू आणि राजपाल यादव महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाचे निर्माते अक्षय कुमार, शोभा कपूर आणि एकता कपूर आहेत. ‘भूत बंगला’ हा चित्रपट 10 एप्रिल 2026 रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राजपाल यादव यांचे नाव 9 कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणामुळे चर्चेत आले होते. या प्रकरणात त्यांना तुरुंगातही जावे लागले होते. मात्र सध्या त्यांना तात्पुरता दिलासा मिळाल्याचे समोर आले आहे. आपल्या भन्नाट कॉमेडी शैलीमुळे प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलेले राजपाल यादव आता ‘भूत बंगला’मधील त्यांच्या भूमिकेत कसे दिसतील, याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ