मतदारयाद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीविरोधात महाविकास आघाडीने १ नोव्हेंबरला सत्याचा मोर्चा पुकारला होता. महाविकास आघाडी आणि मनसेने आज मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात सत्याचा मोर्चा (Satyacha Morcha Mumbai) काढण्यात आला. या मोर्च्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), त्याबरोबरच मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray), शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, बाळासाहे थोरात यांच्यासह मनसे आणि महाविकास आघाडीमधील अनेक नेते सहभागी झाले होते.
मतदार याद्यांमधील घोटाळ्यामुळे विरोधक चांगलेच तापले आहे. विरोधकांनी सरकारला चान्गलाचं कात्रीत पकडलं आहे. या सत्याच्या मोर्चात हजारो लोकांनी गर्दी केली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार यांनी हजेरी लावली. मोर्चा यांनी फॅशन स्ट्रीटपासून मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत पायी चालत होता. यानंतर मुंबई महापालिका मुख्यालयासमोर सभा झाली. यात पुण्याच्या गोंधळींनि देखील जागर केला. यासभेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भाषण करत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आणि टीका केली.
सगळे बोलत आहेत मतदार खोटे आहेत. आम्ही बोलतोय, भाजपचे लोक बोलताय आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील लोक हि बोलताय…मग निवडणुका घ्यायची घाई का? कशासाठी चालू आहे हा खेळ? असा सवाल राज ठाकरेंनी भाषणात उपस्थित केला. मतदार याद्या साफ करा, पारदर्शक याद्या केल्यावर यश-अपयश कोणाचं, हे स्पष्ट होईल, असं विधान राज ठाकरे यांनी केले. यावेळी राज ठाकरेंनी दुबार मतदारांचा पुरावा देखील सभेत दिला. आज मी इकडे पुरावा घेऊन आलो आहे. त्यासोबत मी दुबार मतदारांना घेऊन आलोय, असं म्हणत राज ठाकरे यांनी दुबार मतदारांच्या याद्यांच्या कागदपत्रांचा पुरावा दाखवला. यावेळी तेथे उद्धव ठाकरे आणि शरद पवार देखील पाहात बसले. राज ठाकरेंनी सभेसाठी उपस्थित असलेल्या माणसांमध्ये दुबार मतदारांच्या याद्यांची कागदपत्रं ठेवली होती. जेव्हा कधी निवडणुका होतील तेव्हा याद्यांवर काम करा, याद्या पारदर्शक ठेवा. प्रत्येक चेहरा समाजाला पाहिजे. दुबार-तिबार तिथे आले, तर तिथेच फोडून काढा आणि मग पोलिसांच्या ताब्यात द्या, असा सूचना राज ठाकरेंनी यांनी सभेत दिल्या




