राज ठाकरे म्हणाले सरकारच संशयाचं भूत नाचवत आहे.
दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्रकरणात एफआयआर दाखल करून चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार करत आहेत, त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कठोर भाष्य केले आहे.
राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, हा अपघात धुक्यामुळे झाला की अन्य कारणामुळे हे महाराष्ट्राला स्पष्ट झालेले नाही. रोहित पवार यांनी तांत्रिक माहिती देऊन मुद्दे मांडले, पण एफआयआर का दाखल होत नाही आणि चौकशीसाठी अडथळे का निर्माण केले जात आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राज ठाकरे म्हणाले की, रोहित पवारांनी अनेकदा एफआयआर नोंदवण्याचा प्रयत्न केला, मात्र डीसीपींनी त्यांना थांबवले. हे कोणाच्या दबावाखाली होत आहे, सरकारकडून संशयाचं भूत नाचवलं जात आहे, असा सवाल त्यांनी केला.
त्यांनी पुढे म्हटले की, रोहित पवारांसाठी एफआयआर नोंदवला जात नसेल, तर सामान्य नागरिकांसाठी काय न्याय राहणार? कुटुंबाच्या मागणीनुसार चौकशी व्हावी यात काही गैर नाही. हा अपघात दुःखद असून, सुनेत्रा पवारसह संबंधित अधिकाऱ्यांनी यावर बोलायला हवे, असा राज ठाकरे यांनी आग्रह धरला.




