Purva kaushik : शिवा’नंतर पूर्वा कौशिक आता साकारणार ‘सोज्वळ ज्योती’!

spot_img

टॉमबॉय प्रतिमेतून बाहेर पडत पूर्वाने स्वीकारले साधेपणाचे आव्हान; जाणून घ्या ‘दीपज्योती’ मालिकेतील तिच्या भूमिकेचा खास प्रवास

झी मराठी वाहिनीवर १३ एप्रिलपासून ‘दीपज्योती’ ही एक नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. या मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे अभिनेत्री पूर्वा कौशिक एका अगदी वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी ‘शिवा’ मालिकेत एका धाडसी आणि टॉमबॉय मुलीची भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या पूर्वाला आता एका अत्यंत साध्या, सोज्वळ आणि घरगुती मुलीच्या रूपात पाहणे रंजक ठरणार आहे.

पूर्वाने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “शिवा” च्या प्रतिमेनंतर प्रेक्षक तिला एका साध्या नायिकेच्या रूपात स्वीकारतील का, अशी धाकधूक तिच्या मनात होती. मात्र, ‘ज्योती’च्या भूमिकेसाठी मिळालेला कॉल तिच्यासाठी सुखद धक्का होता. ज्योती ही केवळ साधी मुलगी नाही, तर ती खूप समजूतदार आणि गुणी आहे. आई, दोन बहिणी आणि भावासोबत राहणाऱ्या ज्योतीचे तिच्या वडिलांच्या व्यसनामुळे त्यांच्याशी मतभेद आहेत, हा एक भावनिक पैलू या मालिकेत पाहायला मिळेल.

ही भूमिका साकारणे पूर्वेसाठी सोपे नाही. खऱ्या आयुष्यात स्पष्टवक्तेपणा असलेल्या पूर्वाला ज्योती होण्यासाठी आपल्या आवाजातील गोडवा आणि वागण्यातील नाजूकपणा यावर खूप मेहनत घ्यावी लागत आहे. साधेपणा पडद्यावर जिवंत करणे हे एक कलाकारासाठी सर्वात मोठे आव्हान असते, असे ती मानते. शूटिंगच्या पहिल्याच दिवशी सहकलाकारांसोबत जमलेली गट्टी आणि टीमचा सकारात्मक प्रतिसाद पाहता, ‘दीपज्योती’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेईल, असा विश्वास पूर्वाने व्यक्त केला आहे. आता ‘शिवा’प्रमाणेच ‘ज्योती’लाही प्रेक्षक तितकेच प्रेम देतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ