अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman)यांनी आज 1 फेब्रुवारी 2026 रोजी संसदेत सलग नव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये भारताच्या समृद्ध हस्तकला परंपरेचे दर्शनही घडवले. अर्थमंत्र्यांनी आज परिधान केलेली गडद जांभळ्या रंगाची ‘कट्टम’ कांजीवरम सिल्क साडी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली. मात्र ही अस्सल कांजीवरम साडी सुंदर दिसायला हवी असेल तर अस्सल असावी. आज आम्ही तुम्हाला अस्सल कांजीवरम साडी कशी ओळखायची याबद्दल महिती देत आहोत.
कांजीवरम साडी (Kanchipuram silk sari) ही तिच्या राजेशाही लुक आणि पारंपरिक सौंदर्यामुळे विशेष आणि महत्त्वाच्या प्रसंगांसाठी सर्वाधिक योग्य मानली जाते. कांजीवरम साडी ही भारतातील सर्वात श्रीमंत, पारंपरिक आणि प्रतिष्ठित रेशमी साड्यांपैकी एक मानली जाते. तामिळनाडूतील कांचीपूरम या ऐतिहासिक शहरात हातमागावर विणल्या जाणाऱ्या या साड्या शुद्ध रेशीम, जाड पोत, उठावदार रंग आणि सोन्या-चांदीच्या जरीच्या कामासाठी ओळखल्या जातात. टिकाऊपणा, राजेशाही लुक आणि पिढ्यान्पिढ्या वापरता येईल असा दर्जा असल्यामुळे महिलांमध्ये या साडीबद्दल विशेष आकर्षण आहे.




