spot_img

Pune Politics : पुण्यात ‘या’ 4 शहराध्यक्षांचा झाला दारुण पराभव

spot_img

शुक्रवारी पुणे महानगरपालिका (PMC) निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत भाजपनं जोरदार मुसंडी मारत 120 जागांवर विजय मिळवला आहे. इथं भाजपनं विजय खेचून आणला असला तरी इथं अनेक धक्कादायक निकाल बघायला मिळाले. पुण्यात अजित पवार गटाला सपशेल अपयश मिळालं आहे. तसेच इतरही दिग्गजांना इथं पराभवाचा सामना करावा लागला आहे. पुणे महानगर पालिका निवडणुकीत सहा मुख्य राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष रिंगणात उतरले होते. मात्र, या ‘हाय-प्रोफाईल’ लढतींमध्ये मतदारांनी धक्कादायक निकाल दिले असून, चक्क चार बड्या पक्षांच्या शहराध्यक्षांना पराभवाचा धूळ चारली आहे. केवळ भाजप आणि काँग्रेसचे शहराध्यक्षच निवडून येण्यात यशस्वी ठरले आहेत.

भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांनी आपल्या प्रभागातून विजय मिळवत पक्षाचा गड राखला आहे. त्याच बरोबर काँग्रेसचे अनुभवी नेते आणि शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनीही विजय संपादन केला असून पुण्यात काँग्रेसची ताकद दाखवून दिली आहे. दुसरीकडे, ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजय मोरे, पुण्यातील मनसेचा आक्रमक चेहरा आणि शहराध्यक्ष साईनाथ बाबर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ