spot_img

Pune Politics : पुणे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट !

spot_img

पुणे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. ३०-३१ जानेवारीपर्यंत पार पडणं अपेक्षित असणारी ही निवडणूक आता लांबणीवर पडली असून, नव्या महापौरांच्या निवडीसाठी आता ६ फेब्रुवारी हा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. प्रशासकीय कारणांमुळे हा बदल करण्यात आल्याचे समजते.पुणे महानगरपालिकेने महापौर निवडणूक प्रक्रियेसंदर्भात विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून मार्गदर्शन आणि तारखेबाबत विचारणा केली होती. या पत्रावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर विभागीय आयुक्तांनी निवडणुकीसाठी ६ फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळणार आहे.

विभागीय आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार, ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता महानगरपालिकेची पहिली विशेष सभा बोलावण्यात आली आहे. याचवेळी महापौर आणि उपमहापौर पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या सभेच्या अध्यक्षतेसाठी कोणाची नियुक्ती केली जाते, याकडेही आता सर्वांचे लक्ष लागले आहे.विभागीय आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार, ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता महानगरपालिकेची पहिली विशेष सभा बोलावण्यात आली आहे. याचवेळी महापौर आणि उपमहापौर पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या सभेच्या अध्यक्षतेसाठी कोणाची नियुक्ती केली जाते, याकडेही आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ