spot_img

Pune News : महिला कुस्तीत सोनाली मंडलिकने पटकावली गदा

spot_img

ओतूर,प्रतिनिधी: रमेश तांबे

ओतूरच्या कवठे येमाई यात्रेत महिला कुस्त्यांचा थरार; सोनाली मंडलिकचा विजय.

जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे भरलेल्या श्री कवठे येमाई यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मॅटवरील महिला कुस्त्यांच्या आखाड्याने यंदा विशेष आकर्षण ठरले. अंतिम फेरीतील मानाच्या कुस्तीत जुन्नरची विशाखा चव्हाण आणि पुण्याची अनुभवी मल्ल सोनाली मंडलिक आमनेसामने आल्या होत्या.

या लढतीत सोनाली मंडलिक यांनी दमदार कामगिरी करत विजय मिळवला. त्यांना २५ हजार ७०० रुपयांचे पारितोषिक आणि मानाची गदा प्रदान करण्यात आली. ही गदा स्व. गोपाळराव रामभाऊ डुंबरे (गुरुजी) यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नाती निशा ढोबळे यांच्या वतीने देण्यात आली.

या आखाड्यात ठाणे, पुणे, नाशिक, संभाजीनगर, तसेच हरियाणा, दिल्ली यांसारख्या विविध ठिकाणांहून महिला मल्लांनी सहभाग घेतला होता. एकूण १९ कुस्त्या रंगल्या, शेवटची कुस्ती सुमारे २७ हजार रुपयांची झाली. संपूर्ण स्पर्धेसाठी सुमारे १.३९ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. कार्यक्रमाला स्थानिक मान्यवर, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या कुस्ती स्पर्धेचे सुत्रसंचालन जे. पी. ढमाले यांनी केले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ