spot_img

Pune News : सून जिंकताच जुन्नरमध्ये देवराम लांडे यांनी लंगोट घालून केला जल्लोष

spot_img

महाराष्ट्रामध्ये १२ जिल्हा परिषद आणि १२५ नगरपंचायत समिती निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू असून काही ठिकाणी विजयी उमेदवारांची नावे समोर आली आहेत. विजयी झाल्यानंतर गुलाल उधळत उमेदवारांनी जल्लोष केला. अशातच नेहमी या ना त्या कारणामुळे चर्चेत असणारे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांनी सून जिंकली म्हणून लंगोट घालून जल्लोष केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुण्याच्या जुन्नरमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे (Devram Lande) यांनी थेट लंगोट घालून जल्लोष केलाय. त्यांच्या सून मोनाली अमोल लांडे या घडाळ्याचा चिन्हावर जिल्हा परिषद निवडणुकीच्या गटात विजयी झाल्या आहेत. मोनाली लांडे विजयी झाल्यानंतर त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

गुलाल उधळत कार्यकर्ते बेभान होऊन नाचत होते, तर दुसरीकडे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांनी चक्क लंगोट घालून आले. कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बसून लांडे यांनी जल्लोष सुरू केला. अजित दादांचा फोटो हातात घेऊन देवराम लांडे हटके जल्लोष केला. देवराम लांडे नेहमीचं या-ना-त्या कारणाने चर्चेत असतात, विजयी जल्लोषात ही तोच कित्ता त्यांनी गिरवला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ