spot_img

Pune Land Scam : “पार्थ पवारांना व्यवहार रद्द करण्याचा अधिकारच नाही!” कोरेगाव पार्क जमीन प्रकरणात अंजली दमानियांचा स्फोटक दावा

spot_img

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत केला मोठा खुलासा; “जमिनीची मालकी शितल तेजवानीकडे नसल्याने व्यवहार अवैध,” असा ठाम आरोप.

पुण्यातील कोरेगाव पार्क येथील पार्थ पवार (parth Pawar) यांच्या अमेडिया कंपनीच्या जमीन खरेदी प्रकरणाने पुन्हा एकदा राजकीय वाद पेटवला आहे. आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damaniya) यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर थेट आरोपांची सरबत्ती केली.

दमानिया म्हणाल्या, “या व्यवहारात 1800 कोटी रुपयांची जमीन केवळ 300 कोटींमध्ये घेतल्याचं सांगितलं जातं. पण गायकवाड कुटुंबाला मूळात मिळालेली महारवतनची जमीन नंतर खालसा झाली होती आणि ती परत देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या नावावर नसलेल्या जमिनीचा व्यवहार कोणत्याही परिस्थितीत होऊ शकत नाही.”

त्यांनी पुढे सांगितले की, “शितल तेजवानी नावाच्या व्यक्तीने 11,000 रुपये भरून 30 डिसेंबर 2024 रोजी कलेक्टरांना पत्र दिलं होतं. मात्र, त्या पत्रावर कलेक्टरांनी कोणतीच कारवाई केली नाही. ही गंभीर बाब असून अशा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हायला हवी.”

दमानिया यांच्या मते, शितल तेजवानी ज्या ‘पॉवर ऑफ अटर्नी’च्या आधारे हा व्यवहार करतेय, ती कधीच रजिस्टर झालेली नाही. “अशा परिस्थितीत ती व्यक्ती जमिनीच्या खरेदी-विक्रीवर सही करूच शकत नाही. तसेच व्यवहार रद्द करण्याचं अधिकारही तिच्याकडे नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

त्यांनी पुढे सांगितले, “हा व्यवहार ‘रद्द’ करण्यासाठी ठरावीक कायदेशीर प्रक्रिया आवश्यक असते. विक्रेता आणि खरेदीदार दोघे मिळून तो रद्द करू शकतात. मात्र, शितल तेजवानी ही जागेची मालक नसल्याने तिच्या किंवा अमेडिया कंपनीच्या घोषणांना कायदेशीर वैधता नाही. फक्त सरकार सिव्हिल कोर्टात दावा दाखल केल्यासच हा करार रद्द होऊ शकतो.”

दमानिया यांनी माध्यमांमध्ये फिरणाऱ्या “42 कोटी रुपये भरल्यानंतर व्यवहार रद्द होणार” या बातम्यांनाही फेटाळून लावत म्हटलं, “हा दावा पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे.”

या खुलाशामुळे कोरेगाव पार्क जमीन प्रकरणाला नवा कलाटणी मिळाली असून, आता राज्य सरकार आणि पार्थ पवार यांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ