पक्षाने आपल्यालाच प्रभाग क्रमांक ३६ मधून उमेदवारी दिली असून आपणच पक्षाचे अधिकृत उमेदवार आहोत असा त्याचा दावा आहे.
पुण्यात एकाच पक्षाच्या दोन उमेदवारांमध्ये लागलेल्या चढाओढीतून एकानं एबी फॉर्म चक्क गिळण्याचा प्रकार समोर आला आहे. एबी फॉर्म गिळणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार उद्धव कांबळे याच्यावर निवडणूक (Election) अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली. पोलिस त्या उमेदवाराचा शोध घेत होते, फॉर्म गिळलेल्या उद्धव कांबळे हा उमेदवार स्वतःहून पोलीस स्टेशनला आला आहे. काल गुन्हा दाखल झाल्यापासून पासून ७० पोलीस त्याचा शोध घेत होते. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह आपण स्वतःहून पोलीसांसमोर हजर झाल्याचं त्याच म्हणणं आहे. पक्षाने आपल्यालाच प्रभाग क्रमांक ३६ मधून उमेदवारी दिली असून आपणच पक्षाचे अधिकृत उमेदवार आहोत असा त्याचा दावा आहे.(Pune Election 2026)
एबी फॉर्म गीळल्याचा आरोप असलेला एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा पुण्यातील उमेदवार उद्धव कांबळेने आपल्या हातून अनावधानाने हा प्रकार घडल्याचं म्हटलंय. पक्षाने आपल्यालाच उमेदवारी दिली असून मच्छिंद्र ढवळे या प्रतिस्पर्धी उमेदवाराने एबी फॉर्म चोरल्याचा त्याने आरोप केला आहे. मच्छिंद्र ढवळेने एबी फॉर्म भरल्याचे निवडणूक अधिकार्यांनी आपल्या पासून लपवल्याने आपल्याला राग आल्याने आपण एबी फॉर्म फाडल्याच उद्धव कांबळेंनी म्हटलंय.




