spot_img

Pune Crime : आपत्कालीन सेवेला खोटा कॉल केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल

spot_img

ओतूर,प्रतिनिधी: रमेश तांबे

दारू पिवून आपत्कालीन सेवेच्या डायल ११२ नंबरवर खोटा कॉल करून पोलीस यंत्रणेचा गैरवापर करणाऱ्या इसमावर ओतूर पोलीसांकडुन गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरिक्षक लहू थाटे यांनी दिली. किरण रामदास गायकवाड (रा.उंब्रज नं. १ ता. जुन्नर जि.पुणे) असे गुन्हा दाखल झालेले इसमाचे नाव आहे.

या याबाबत अधिक माहिती देताना श्री थाटे म्हणाले की, दि.१८ रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास किरण रामदास गायकवाड (रा.उंब्रज नं. १ ता. जुन्नर जि.पुणे) याने डायल ११२ या आपत्कालीन सेवेवर ” चार दिवसापुर्वी कॉलर यांना मारहाण झालेली आहे, शिवीगाळ करत आहे, मदत हवी आहे.” अशा मजकुराचे एका पाठोपाठ चार कॉल केले होते. प्राप्त कॉलच्या अनुषंगांने पोलीस घटनास्थळी गेले असता इसम नामे किरण रामदास गायकवाड हा दारूच्या नशेत आढळुन आला सदरच्या इसमास कोणीही मारहाण केली नव्हती, सदरचा इसम हा दारू पिवून सार्वजनिक रस्त्यावर गोंधळ घालत असताना मिळून आला. किरण रामदास गायकवाड यास प्राथमिक आरोग्य केंद्र ओतूर या ठिकाणी नेले असता तो दारूच्या नशेत असल्याचे डॉक्टरांनी अहवाल दिला आहे. सदरचा इसम हा वारंवार डायल ११२ या आपत्कालीन सेवेवर कॉल करून पोलीसांची दिशाभुल करून पोलीस यंत्रणेचा गैरवापर करत असल्याने सदरच्या इसमाचे विरूध्द ओतूर पोलीस स्टेशनला  भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम २१७ सह महाराष्ट्र दारूबंदी अधिनीयम कायदा कलम ८५ (१) त्याचप्रमाणे मुंबई पोलीस कायदा कलम ११०,११२,११७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर आरोपीवर ओतूर पोलीस कायदेशीर कारवाई करीत आहेत. सदर दाखल गुन्ह्याचा पुढील तपास ओतूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी लहु थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भरत सुर्यवंशी हे करत आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ