spot_img

Pune Crime : ओतूर पोलिसांकडून अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या टोळीचा पर्दापाश

spot_img

गुटख्यासह 48 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त.

ओतूर पोलिसांकडून अवैध गुटखा (Gutka) वाहतूक करणाऱ्या टोळीचा पर्दापाश करण्यात आला आहे. जुन्नर तालुक्यातील खिरेश्वर गावच्या हद्दीत एका कंटेनर मधील गुटखा पिकअप गाडीत भरला जात होता. ओतूर पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तिघांना ताब्यात घेतले. त्याचप्रकारे गुटख्यासह कंटेनर व पिकअप असा एकूण 48 लाख 40 हजार चारशे रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. 21 डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असल्याचे ओतूर पोलिसांनी सांगितले. सुरज रघुनाथ मेगळे (वय 23 वर्षे,रा.रोहोकल,ता. खेड,जि.पुणे) ,अतुल अनिल काळे (वय 25 वर्षे,रा.रोहोकल,ता.खेड,जि.पुणे), माउली विठ्ठल काळे ( वय 18 वर्षे,रा. रोहोकल, ता. खेड, जि.पुणे) या तिघांना ओतूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कंटेनरचा चालक हा अंधाराचा फायदा घेऊन,पळून जाण्यात यशस्वी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ओतूर (Otur) पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे म्हणाले की, खिरेश्वर गावाच्या हद्दीत 21 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास एका कंटेनर मधील गुटखा पिकअप गाडीमध्ये भरला जाणार असल्याची माहिती ओतूर पोलीसांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली.ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे, खिरेश्वर गावचे पोलीस पाटील व स्थानिक ग्रामस्थांसह संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली. एम.एच.01 सी.व्ही 9125 मधील गुटखा, पिकअप गाडी नं.एम.एच.14 जी.यु.3789 यामध्ये टाकत असताना सुरज रघुनाथ मेगळे (वय 23 वर्षे,रा. रोहोकल,ता.खेड,जि.पुणे ),अतुल अनिल काळे (वय 25 वर्षे,रा.रोहोकल,ता. खेड,जि.पुणे), माउली विठ्ठल काळे (वय 18 वर्षे,रा.रोहोकल,ता.खेड,जि.पुणे) हे मिळून आले. तसेच कंटेनर चालक हा अंधाराचा फायदा घेऊन त्या ठिकाणावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. त्यानंतर पोलीस सदरचा कंटेनर व पिकअप गाडी ओतूर पोलीस ठाण्यात घेऊन गेले. संपूर्ण मुद्देमालाची खात्री केली असता पिकअप गाडी व कंटेनरमध्ये सापडलेला शशी शेखर एंटरप्रायजेस कंपनीचा शुध्द प्लस पान मसाला व शशी शेखर एंटरप्रायजेस कंपनीचा नवी च्युविंग तंबाखू असा एकूण 28 लाख 40 हजार 400 रुपये किमतीचा गुटखा व 20 लाख रूपये किमतीची दोन्ही वाहने कंटेनर व पिकअप असा एकूण 48 लाख 40 हजार 400 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळून आलेल्या मुद्देमालाचा पंचनामा करून पो.कॉ. ज्योतीराम पवार यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्याने ओतूर पोलीस स्टेशनला विविध कलमन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून,तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल,अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे,जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि लहु थाटे, पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, पो.हवा देविदास खेडकर, पो.हवा.बाळशिराम भवारी,पो.हवा. धनंजय पालवे, पो.कॉ.ज्योतीराम पवार, पो.कॉ. मनोजकुमार राठोड, पो.कॉ. संतोष भोसले, पो.कॉ. रोहीत बोंबले तसेच खिरेश्वर गावचे पोलीस पाटील अभिजीत भौरले, खुबी गावचे पोलीस पाटील अविनाश सुपे, ग्रामस्थ निले

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ