spot_img

Pune Crime : महामार्गावर कोयत्याचा धाक दाखवून चोरी करणाऱ्या टोळीच्या पर्दाफाश

spot_img

कोयत्याचा धाक दाखवणाऱ्यांना पोलिसांनी शिकवला धडा

पुणे ते अहिल्यानगर महामार्गावर कोयत्याचा धाक दाखवून लोखोंची लूट करण्यात आली आहे. पुणे (Pune) ते अहिल्यानगर महामार्गावर पहाटे 4 च्या सुमारास सुरज पेट्रोल पंपाजवळ निसान टेरेनो हे रोडच्या कडेला आपली चारचाकी पार्क करून झोपले होते. यादरम्यान मोटार सायकलवर आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवत त्यांच्याकडून पाचशे रुपये व त्यांच्या पत्नीकडून दिड तोळ्याचे गंठन असा एकूण 9 हजार पाचशे रूपयांचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला होता. पोलिसात या घटनेचा गुन्हा दाखल केला गेला. या अनुषंगाने पोलीस अधीक्षक,पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदार यांची बैठक घेतली. योग्य ते मार्गदर्शन करून सुचना केल्या.जबरी चोरीचे गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू करण्यात आला. घटनास्थळांची पाहणी करून गुन्ह्यातील फिर्यादी व साक्षीदार यांच्याशी संवाद साधला असता, सर्व घटनांमध्ये कोयत्याचा धाक दाखविण्यात आल्याचे समोर आले. चोरटयांनी गुन्हा केल्यानंतर अहिल्यानगरच्या दिशेने ते पळून गेले. स्था.गु.शा. व शिक्रापूर पो स्टे कडील तपास पथकाने एकत्रित गुन्हयाचा तपास केला. या तपासात 125 किमी पर्यंत सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले असता अहिल्यानगर ते राहूरी रोडकडे गेल्याचे समोर आले.

गोपनीय माहितीच्या आधारे तपास पथकाने आरोपी आकाश शिंदे, महेश शिंदे, राहूल पवार तिघांना वेळद घाट परिसरातून ताब्यात घेतले. त्यांची सखोल चौकशी केली असता, त्यांनीच गुन्हा केलयाचे उघडकीस झाले.सदर आरोपींकडून मोटार सायकल, 2 कोयते, 7.5 तोळे सोन्याचे दागिने असा एकूण 5,62,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आरोपींना ३ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. सध्या तीनही आरोपी हे न्यायालयीन कोठडीत आहेत.सदरचे आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर मालमत्ता चोरीचे, दरोडयाचे गुन्हे दाखल असून आरोपी आकाश शिंदे याच्यावर 8 गुन्हे दाखल आहेत. तर आरोपी महेश शिंदे याच्यावर 6 गुन्हे आणि आरोपी राहुल पवारवर 2 गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल,अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, शिरूर विभाग, वांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिक्रापूर पो स्टे चे पो.नि. दिपरत्न गायकवाड, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक महादेव वाघमोडे, स्थानिक गुन्हे शाखेचे शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर महेश डोंगरे, पोसई विजय मस्कर, स्थानिक.गुन्हे शाखेचे अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजु मोमीण, संजू जाधव, सागर धुमाळ, शिक्रापूर पो स्टेचे अंमलदार जयराज देवकर, अमोल नलगे, अमोल दांडगे, रोहीत पारखे यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ