spot_img

Pune Accident : मुथाळणे घाटात मजुरांच्या पिकअपला भीषण अपघात; १८ जण जखमी, १ गंभीर

spot_img

कामावरून परतताना काळाचा घाला: अकोले तालुक्यातील मजुरांवर ओतूर आणि आळेफाटा येथे उपचार सुरू

ओतूर,प्रतिनिधी दि.२३ मार्च [ रमेश तांबे ]

जुन्नर तालुक्यातील आदिवासी पट्ट्यात असलेल्या मुथाळणे घाटात रविवारी सायंकाळी एका पिकअप गाडीला भीषण अपघात झाला. शेतमजुरांना घेऊन जाणारी पिकअप (क्र. MH 42 M 5733) वाघोबा मंदिरामागील वळणावर उलटल्याने एकूण १९ मजूर जखमी झाले आहेत. यातील १८ मजुरांना किरकोळ व मध्यम स्वरूपाची दुखापत झाली असून, एका मजुराची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. हे सर्व मजूर अकोले तालुक्यातील सातेवाडी, उंबरेवाडी आणि परिसरातील रहिवासी असून, जुन्नरमधील बनकरफाटा आणि उदापूर परिसरात शेतीकामासाठी आले होते. काम संपवून घरी परतत असताना सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

अपघातानंतर जखमींना तातडीने ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे १४ मजुरांवर प्राथमिक उपचार करण्यात आले असून, निवृत्ती मुठे, खेमा मुठे आणि योगेश मुठे यांच्यावर ओतूरच्या निरामय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेतील गंभीर जखमी रामदास घोडे यांना पुढील उपचारासाठी आळेफाटा येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जिल्हा परिषद सदस्या सोनाबाई दाभाडे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. दरम्यान, संबंधित पिकअप चालकाचा हा दुसरा अपघात असल्याची माहिती समोर येत असून, त्याचे लायसेन्स रद्द करून कठोर कारवाई करण्याची मागणी बिरसा ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष राजू मुठे यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ