spot_img

PT Usha : दादांना श्रद्धांजली वाहिली अन् पतीच्या निधनाने पीटी उषा यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर!

spot_img

दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडली. अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्रासह देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. अशातच देशभरातून अजित पवार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला जातोय. अशातच प्रसिद्ध धावपटू आणि ऑलिम्पिक असोशिएशनच्या अध्यक्षा पी.टी उषा यांनी देखील ट्विट करत श्रद्धांजली अर्पण केली होती. त्यावेळी त्यांनी अजित पवार यांचा अनोखा फोटो शेअर केला होता. अशातच आता पी.टी उषा यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अजित पवार महाराष्ट्र ऑलिम्पिक असोशिएशनचे अध्यक्ष होते.

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या (IOA) अध्यक्षा आणि महान धावपटू पीटी उषा यांचे पती व्ही. श्रीनिवासन यांचे शुक्रवारी केरळमधील राहत्या घरी निधन झालं. श्रीनिवासन यांच्या जाण्याने पीटी उषा यांच्या आयुष्यातील एक भक्कम आधारवड कोसळला आहे. या वृत्तामुळे क्रीडा जगतावर शोककळा पसरली असून, अनेक दिग्गज खेळाडू आणि राजकीय नेत्यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.

पीटी उषा यांच्या यशामागे श्रीनिवासन यांचा सिंहाचा वाटा असल्याचे नेहमीच मानले जाते. ट्रॅकवरच्या कामगिरीपासून ते प्रशासकीय जबाबदाऱ्यांपर्यंत, श्रीनिवासन यांनी प्रत्येक पावलावर उषा यांना साथ दिली. जेव्हा पीटी उषा यांनी ‘पय्योली एक्सप्रेस’ (Payyoli Express) म्हणून जगभरात नाव कमावलं, तेव्हा श्रीनिवासन यांनी पडद्यामागे राहून त्यांच्या सरावाकडे आणि आरोग्याकडे बारकाईने लक्ष दिलं होतं. श्रीनिवासन यांचं निधन हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यांच्या निधनानंतर केरळचे मुख्यमंत्री आणि देशातील अनेक केंद्रीय मंत्र्यांनी पीटी उषा यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ