तब्बल 7 वर्ष डेट केल्यानंतर रेहान हा गर्लफ्रेंडसोबत लग्न करतोय.
काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांच्या घरी लवकरच शहनाईचे सूर घूमणार आहेत. प्रियांका गांधी आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांचा मुलगा रेहान वाड्रा (Rehan ) हा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेहान याचा अविवा बेग (Aviva Baig) हिच्याशी साखरपुडा झाला. आता लवकरच ते लग्न करणार आहेत. मात्र लग्नाची अधिकृत तारीख कधी याची माहिती अजून समोर आलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेहान वाड्राने हा अवीवा हिला गेल्या 7 वर्षांपासून डेट करत होता. त्याने तिला प्रपोज केलं आणि तिनेही त्याचा स्वीकार केला. दोन्ही कुटुंबांच्या सहमतीनंतर या दोघांचा नुकताच साखरपुडा झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, अवीवा बेग ही मूळची दिल्लीची असून तिचे कुटुंबीयही तिथेच स्थायिक आहेत. अवीवाचे कुटुंब हे वाड्रा कुटुंबाच्या खूप नजीकचे असल्याचे समजते. अविवाने तिचे सुरुवातीचे शिक्षण दिल्लीतील प्रतिष्ठित मॉडर्न स्कूलमधून पूर्ण केले आणि नंतर ओपी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीमधून मीडिया कम्युनिकेशन आणि पत्रकारितेमध्ये तिने पदवी प्राप्त केली. अवीवा केवळ एका प्रसिद्ध कुटुंबातील नाही तर तिची स्वतःची वेगळी ओळख देखील आहे. ती एक प्रोफेशनल फोटोग्राफर आणि प्रोड्यूसर देखील आहे. तिच्या अनेक फोटोंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पोर्टल्स आणि प्रकाशनांमध्ये जागा मिळाली आहे.




