spot_img

Priyanka Chopra : प्रियंका बनणार राजमोलीच्या चित्रपटाची ‘मंदाकिनी’… प्रियंकाचा बॉलिवूडमध्ये कमबॅक..!

spot_img

बाहुबली (Bahubali) आणि आर आर आर (RRR) चे दिग्दर्शक एस. एस राजमौली (S. S. Rajmoli) यांच्या चित्रपटाची चाहते आतुरतेनं वाट पाहत असतात. राजमौली यांचा आगामी ‘ग्लोबट्रोटर’ हा चित्रपट चर्चेत आहेआणि लोक याकरता उत्सुकआहेत. या चित्रपटात साऊथ सुपरस्टार महेश बाबू हे प्रमुख भूमिकेत दिसणार असून त्याचबरोबर या चित्रपटात बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा झळकणार आहे. मंदाकिनी या चारेक्टरसाठी तिची निवड करण्यात आली आहे. शिवाय या चित्रपटातील प्रियांकाचा फर्स्ट लूक देखील समोर आला आहे आणि राजमौली यांनी प्रियांकाच्या फर्स्ट लूकचं पोस्टर ट्विट केले आहे. आणि त्यांनी यात प्रियांकाचा कौतुक केलं आहे.

ॲक्शन ॲडव्हेंचरवर आधारित असलेल्या या चित्रपटाची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. राजमौली यांनी प्रियंकाचा फर्स्ट लूक शेअर करत कॅप्शन लिहिले आहे की,“ग्लोबल स्तरावर भारतीय सिनेमाला एक नवीन ओळख देणाऱ्या देसी गर्ल्स स्वागत आहे! मंदाकिनीच्या अनेक छटा लोकांनी पहाव्यात यासाठी मी उत्सुक आहे.” असं ट्विट करत त्यांनी तीच कौतुक केलं आहे. प्रियंकाने देखील तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्टर शेअर केलं असून त्यावर तिचा नवरा निक जोन्स यानेही प्रतिक्रिया दिली आहे.

या चित्रपटाबाबत सध्या अधिक माहिती समोर आलेली नाही. यापूर्वी निर्मात्यांनी चित्रपटातील पृथ्वीराजचा पहिला लूक शेअर केला होता शिवाय जो २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला प्रियांकाचा शेवटचा बॉलिवूड चित्रपट ‘द स्काय इज पिंक’ होता. तेव्हापासून ती हॉलिवूडच्या प्रोजेक्ट्सवर लक्ष केंद्रित करत आहे आणि तिथे ती उत्तम अभिनय करून तिथल्या चाहत्यांना वेड लावत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ