spot_img

Prime Minister Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमनाथच्या शौर्ययात्रेत झाले सहभागी

spot_img

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) दोन दिवसांपासून गुजरातच्या दाैऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी यांचा गुजरातच्या दाैऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. मोदींनी रविवारी सकाळी एका शौर्य यात्रेत सहभाग घेतला. यावेळी 108 घोड्यांची एक प्रतीकात्मक मिरवणूक काढण्यात आली. एक किलोमीटर लांबीच्या या यात्रेदरम्यान पंतप्रधानांनी डमरूही वाजवताना दिसले. संपूर्ण जगाच्या नजरा नरेंद्र मोदी यांच्या या गुजरात दाैऱ्याकडे आहेत. नरेंद्र मोदी यांनी अनेक वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम बघितले. नरेंद्र मोदी यांनी गुजराजच्या सोमनाथ मंदिरात पूजा अर्चना केली. दरम्यान जवळपास 30 मिनिटे मोदी यांनी मंदिरात पूजा केली. हेच नाही तर मंदिरातील पुजाऱ्यांसोबत आणि स्थानिक कलाकारांसोबतही त्यांनी संवाद साधला. मंदिरात त्यांनी ढोल वाजवला.शनिवारी सायंकाळी ते सोमनाथ येथे पोहोचले.

आज सकाळी महमूद गजनी यांच्या 1000 व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित शौर्य यात्रेत पंतप्रधान मोदींनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यानिमित्त देशभरातली शेकडो लोक सोमनाथ मंदिरात पोहोचले होते. काल रात्री सोमनाथ येथे दाखल झाल्यानंतर त्यांच्या हस्ते सोमेश्वर महादेवाची महाआरती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिशूल उचलून अभिवादन केले. 72 तास चाललेल्या ओम मंत्रोच्चार सत्रातही सहभाग घेतला.प्रार्थना करण्यासाठी आणि स्वाभिमान महोत्सवात सहभागी होण्यासाठी काल हजारो भाविक मंदिरात जमले होते या कार्यक्रमादरम्यान अनेक गायकांनी भगवान शिवाला समर्पित भक्तिगीते सादर केली.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ